World Environment Day 2020: पर्यावरण दिनाचं औचित्य साधत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन परिसरात लावले चाफ्याचे रोप; पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने एक रोप लावण्याचे आवाहन
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari | (Photo Credits: ANI)

आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day). पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा देणाऱ्या या दिवसाच्या अनेक राजकीय मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. तर महाराष्ट्राच्या राज्यपालांनी चक्क रोप लावून पर्यावरण संगोपनाचे आवाहन केले आहे. पर्यावरण दिनाचं औचित्य साधत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी आज राजभवन (Raj Bhavan) येथे चाफ्याचे रोप लावले. तसंच प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संवर्धनासाठी किमान एक रोप लावून योगदान द्यावे असे आवाहनही केले आहे. रोप लावल्यानंतर त्याचे संवर्धन करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे रोप लावा आणि त्याचे संवर्धन करा असा संदेश राज्यपालांनी पर्यावरण दिनी दिला आहे.

राज्यपालांनी स्वतः रोप लावून वृक्ष लावण्याचे आणि संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांच्या या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल, अशी आशा आहे. दरम्यान पर्यावरण दिनानिमित्त सुप्रिया सुळे, राजेश टोपे, अनिल देशमुख, शरद पवार यांच्यासह महाराष्ट्र प्रशासनाकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. (World Environment Day 2020: पर्यावरण दिनानिमित्त सुप्रिया सुळे, राजेश टोपे, अनिल देशमुख यांच्यासह राजकीय मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा!)

Governor of Maharashtra Tweet:

दरवर्षी पर्यावरण दिन हा खास थीमवर साजरा केला जातो. यंदाची पर्यावरण दिनाची थीम ही जौवविविधतेवर आधारित आहे. खरंतर पृथ्वीचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी केवळ एक दिवस पुरेसा नसून दैनंदिन जीवनात माणसाने अगदी लहान सहान सवयीत बदल केला तर पर्यावरणाचे रक्षण होण्यास नक्कीच हातभार लागेल.