Mumbai Local (फोटो सौजन्य - फेसबुक)

Ashwini Vaishnaw On Mumbai Local: मुंबई महानगराची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांना आता फक्त 2 मिनिटांत मिळणार लोकल ट्रेन मिळणार आहे. सध्या दोन लोकल ट्रेनमध्ये 3 मिनिटांचे अंतर आहे. आता लोकल गाड्यांचा वेळ 3 मिनिटांवरून 2 मिनिटांपर्यंत कमी केला जाणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी ही घोषणा केली. रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात लोकल गाड्यांचा अंतराल 180 सेकंद (3 मिनिटे) वरून 150 सेकंदांपर्यंत कमी केला जाईल. त्यानंतर, विविध रेल्वे प्रकल्पांच्या पूर्णतेनुसार, हा मध्यांतर आणखी कमी करून 120 सेकंद (2 मिनिटे) केला जाईल.

लोकलने प्रवास करणाऱ्यांना मिळणार दिलासा -

या बदलामुळे मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो. अंतर कमी झाल्यामुळे, गाड्यांची उपलब्धता वाढेल आणि गर्दी कमी होईल. यासोबतच, नवीन तंत्रज्ञान आणि सुविधांसह प्रवासाचा अनुभव सुधारण्याची अपेक्षा आहे. आता रेल्वे ही महत्त्वाकांक्षी योजना कधी अंमलात येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (वाचा - Mumbai Local Train News Update: मुंबईकरांना दिलासा! पश्चिम रेल्वे 27 नोव्हेंबरपासून आणखी 13 एसी ट्रेन सेवा चालवणार, जाणून घ्या सविस्तर)

लोकल ट्रेनची संख्याही वाढणार -

गाड्यांचा अंतराल कमी करण्यासोबतच लोकल गाड्यांची संख्याही 10 टक्क्यांनी वाढवली जाईल. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर दररोज सुमारे 3 हजार लोकल ट्रेन सेवा धावतात. ही संख्या वाढवल्याने गर्दी कमी होईल आणि प्रवाशांना दिलासा मिळेल. (हेही वाचा: Railway Recruitment Board Examination: रेल्वे भरती बोर्ड परीक्षा उमेदवारांसाठी CSMT आणि Nagpur दरम्यान 10 विशेष गाड्या; मध्य रेल्वेची घोषणा)

लोकल गाड्यांमध्ये व्हेंटिलेशन आणि एसी सुविधा -

लोकल ट्रेनमधील प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी रेल्वे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची योजना आखत आहे. वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणे, लोकल ट्रेनमध्ये एचव्हीएसी (हीटिंग, व्हेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग) तंत्रज्ञान लागू केले जाईल. हे तंत्रज्ञान 99.99% बॅक्टेरियामुक्त ऑक्सिजन प्रदान करते, ज्यामुळे ट्रेनमधील हवा स्वच्छ होईल.

दरम्यान, रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, लोकल गाड्यांच्या डब्यांच्या डिझाइनमध्येही बदल करता येतील. तथापि, या संदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाच्या (MUTP) फेज 3 आणि 3A अंतर्गत नवीन कोच समाविष्ट केले जाऊ शकतात.

मुंबई लोकल ट्रेनसाठी 238 नवीन एसी लोकल रेक (ट्रेन सेट) खरेदी केले जाणार आहेत. यापैकी 47 एसी रॅक एमयूटीपी-3 अंतर्गत येणार आहेत आणि 191 एसी रॅक एमयूटीपी-3 ए योजनेअंतर्गत येणार आहेत. तथापि, काही राजकीय विरोधामुळे ही योजना रखडली आहे.