Talathi Bharti 2022: राज्यातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. राज्य शासनाकडून तलाठी भरतीसंदर्भात नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. या अंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तलाठी भरती (Talathi Bharti) केली जाणार आहे. राज्यात तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ अधिकारी असे एकूण 3 हजार 628 पदे निर्माण करण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे.
यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारी महिन्यात या भरतीबाबत जाहिरात निघण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - MPSC: महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- 2021 दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर)
तलाठी आणि मंडळ अधिकारी या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक जिल्ह्यातील तलाठी पदे भरली गेली नाहीत. यासाठी नुकताच शासन निर्णय पारित करण्यात आला आहे. तलाठी भरती न झाल्याने कामकाजाचा भार वाढत आहे, असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. (हेही वाचा - Maharashtra Rojgar Melava: तरुणांसाठी खुशखबर! मुंबईमध्ये 10 डिसेंबर रोजी होणार रोजगार मेळावा; तब्बल 5,590 जागांवर नोकरीची संधी, जाणून घ्या सविस्तर)
दरम्यान, तलाठी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्था अथवा विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचे ज्ञान असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने राज्य सरकारच्या सर्व अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.