वाढत्या शहरीकरणामुळे आज मनुष्य आणि प्राण्यांची वस्ती यांमधील अंतर कमी होत आहे. काही दिवसांपूर्वी अवनी वाघिणीची अमानुष हत्या झाल्यानंतर आता गोंदियातील कोयलारी (Koyalari) भागामध्ये बिबट्याच्या बछड्याला शेपटीला धरून फरफटत नेल्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. प्राणीप्रेमींनी यावर आवाज उठवल्यानंतर प्रशासनानेदेखील या प्रकरणी कारवाई करत तिघांना अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलेल्या माहितीनुसार, गोंदियाच्या जंगलात दोन सहा महिन्यांच्या बछड्यांना काही तरूणांनी त्रास दिला. दोन्ही बघडी जखमी अवस्थेमध्ये जंगलात सापडल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. त्यांना उपचारासाठी पशू रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यानच एकाचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra: A leopard cub died after being manhandled by locals in Koyalari village, Gondia on January 8. Police have arrested three people in connection with the case on the basis of a video that went viral on social media. pic.twitter.com/yUCq4zSw1K
— ANI (@ANI) January 11, 2019
टाईम्स ऑफ इंडियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही तरूण मंडळी बिबट्याला अमानुषपणे फरफटत असल्याचं दिसत आहे. पोलिसांनी व्हिडिओच्या माध्यमातून संबंधित तरूणांना अटक केली आहे. हा प्रकार 8 जानेवारी 2019 चा असून प्राणीप्रेमींनी या संतापजनक व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या बिबट्यांचा मृत्यू नेमका भूकबळीमुळे झाला की अमानुष वागणुकीमुळे याबबतचा खुलासा करण्यात आलेला नाही.