Gold Silver Rate Today: दिवाळीच्या सणामध्ये आज (1 नोव्हेंबर) लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan) साजरं केले जाणार आहे. तिन्ही सांजेला लक्ष्मीचं पूजन करून घरा मध्ये धनसंपत्ती, सुख, समृद्धी मध्ये वृद्धी व्हावी अशी कामना केली जाते. दिवाळीच्या सणांमधील हा एक महत्त्वाचा दिवस असल्याने या दिवशी सोनं खरेदीची रीत आहे. सोन्याच्या रूपात लक्ष्मी घरात आणली जाते. मग आज तुम्ही देखील सोनं खरेदीचा विचार करत असाल तर पहा आज लक्ष्मी पूजन दिवशी सोन्याचा, चांदीचा दर काय आहे?
Goods Return च्या वेबसाईट नुसार, आज सोन्याचा दर 24 कॅरेट सोन्यासाठी प्रतिग्राम 8056 आहे. तर 22 कॅरेट साठी सोन्याचा दर प्रतिग्राम 7385 रूपये आहे. तर चांदीचा दर प्रतिकिलो 97,000 आहे. दरम्यान कालच्या तुलनेत आज सोन्या,चांदीच्या दरामध्ये घट झालेली आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी आजचा दिवस चांगला आहे. सोन्याचे दर अनेक गोष्टींमुळे वर-खाली होत असतात.
सोन्याचे दर हे शहरानुसार, सराफा दुकानानुसार देखील थोड्या फार फरकाने वर खाली असतात. दरम्यान तुम्ही सोन्यात दागिन्यांच्या स्वरूपात खरेदी करणार असाल तर त्यामध्ये घडणावळ आणि टॅक्स देखील द्यावे लागतात. दागिन्यांसोबतच डिजिटल सोनं किंबा बॉन्डच्या स्वरूपात देखील सोनं खरेदी केली जाते. गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहिलं जातं आहे. नक्की वाचा: Gold Quality and Purity: 22 कॅरेट, 23 आणि 24 Carat सोने म्हणजे काय? तिन्हीमध्ये नेमका फरक काय?
आज लक्ष्मीपूजन आणि कुबेर पूजन केले जाणार आहे. यामध्ये संध्याकाळी लक्ष्मी पूजन करण्यासाठी सायं. ६ वाजून ४ मिनिटांपासून ते रात्री ८-३५ पर्यंत शुभ काळ आहे. लक्ष्मी पूजनासोबतच उद्या, 2 नोव्हेंबर हा दिवाळी पाडवा आहे. या निमित्ताने देखील सोनं खरेदी केली जाऊ शकतो.