Gold Jewelery | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

सोने दर (Gold Price Today) आंतरराष्ट्रीय बाजारात काहीसे कमी अधिक होत आहेत. सोने मौल्यवान धातून असल्याने या दरात नेहमीच चढ उतार पाहायला मिळतात. आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात प्रति तोळा म्हणजेच प्रति दहा ग्रॅम सोन्याची किंमत 46,840 रुपये आहे. या आधीच्या ट्रेंडमध्ये सोने धातूची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,820 रुपयांवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार चांदी प्रति किलो 61,600 रुपये दराने विकली जात आहे. अर्थात सोने, चांदी दर जीएसटी न लागता वेगळे असतात. जीएसटी आणि देशभरातील विविद राज्यांचे उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क (घडणावळ) यांमुळे सोने दरात बदल पाहायला मिळतात. जाणून घ्या महाराष्ट्रातील (Gold Rate in Mumbai Maharashtra) प्रमुख शहरांतील सोने दर.

गुड रिटर्न्स बेवबाईटने आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबई सराफा बाजारात सोने दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळते. महाराष्ट्रातील विविध शहरांमधील सोने दर खालील प्रमाणे. (खाली दिलेले दर हे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दर आपल्याला आपल्या नजिकच्या ज्वेलर्समध्ये पाहायला मिळू शकतात.) (हेही वाचा, Gold Quality and Purity: शुद्ध असूनही 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवले जात नाहीत, जाणून घ्या कारण)

मुंबई

22 कॅरेट सोने- 46,840 (प्रति 10 ग्रॅम )

24 कॅरेट सोने- 47,840 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

पुणे

22 कॅरेट सोने- 46,280 (प्रति 10 ग्रॅम )

24 कॅरेट सोने- 49,550 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

नागपूर

22 कॅरेट सोने- 46,840 (प्रति 10 ग्रॅम )

24 कॅरेट सोने- 47,840 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

कोरोना व्हायरस महामारीने जगभरातील अर्थव्यवस्थेला मोठा धक्का पोहोचवला. याला सोने बाजारसुद्धा (Gold Market) अपवाद राहिला नाही. दरम्यान, कोरोना स्थिती असूनही सोने बाजार तेजीत राहिल्याचेही मधल्या काळात पाहायला मिळाले. कोरोनातून स्थिती सावरत असल्याचे चित्र जगभरात निर्माण होताच सोने बाजार पुन्हा घसरला. आता कोरोनाचा नवा ओमिक्रॉन (Omicron) व्हेरीएंट आला आहे. त्यामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. अशात सोने बाजार (Gold, Silver Prices) मात्र पुन्हा एकदा वधारताना दिसतो आहे.