गोव्यात होणार 'Nude Party'? शेअर केलेल्या पोस्टने सोशल मिडियावर खळबळ
Goa Nude Post (Photo Credits: Facebook)

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या पोस्टने गोवा प्रशासनाची झोप उडाली आहे. गोव्यात (Goa) एका न्यूड पार्टीचे (Nude Party) चे आयोजन करण्यात आले असल्याची ही पोस्ट आहे. उत्तर गोव्यातील मोरजिम समुद्र किनारी ही न्यूड पार्टी होणार असल्याचं म्हटलं गेलं आहे. दरम्यान, पोलिसांनी याची चौकशी सुरू केली असून राज्यात असे प्रकार होऊ देणार नाही असं स्पष्ट केलं आहे. तसेच पोस्टवररून या भारतीय महिलांसह परदेशी मुलींचाही सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

न्यूज 18 लोकमतने दिलेल्या माहितीनुसार, या पार्टीमध्ये 15 परदेशी महिला आणि 10 पेक्षा जास्त भारतीय महिलांचा समावेश आहे. या पार्टीत हवं तसं सेक्स करता येईल असंही पोस्टरवर नमूद केलं आहे. या पोस्टर्सची गांभीर्यानं दखल घेत पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

हेदेखील वाचा- मुंबई पोलिसांकडून बोरिवली परिसरात डान्स बार वर धाड; 61 जणांना अटक तर 4 बारबालांची सुटका

पोस्टरवर पार्टी कधी आणि नेमकं कोणत्या ठिकाणी होणार याची माहिती देण्यात आलेली नाही. तसेच या पोस्टरवर देण्यात आलेल्या नंबरवर फोनही सातत्यानं व्यस्त लागत असल्याची माहिती तिथल्या स्थानिक न्यूज चॅनलनं दिली आहे. त्यामुळे खरंच अशा प्रकारची पार्टी होणार आहे की फक्त एक अफवा पसरवली हे समजू शकले नाही. पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

गोवा महिला काँग्रेस अध्यक्षांनी या पोस्टरवरून मुख्यमंत्र्यांना जाब विचारला आहे. प्रतिमा कोटिन्हो यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पर्यटन मंत्री मनोहर अजगांवकर यांनी यात लक्ष घातलं पाहिजे. असे प्रकार होऊ नये यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत.