Death Threat To Dhananjay Munde: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अजित पवार (Ajit Pawar) गटातील मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीवरून सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. याच गटातील आणखी एक प्रमुख नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या घडामोडींमुळे पक्षांतर्गत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे हे परळी येथील निवासस्थानी असताना त्यांना धमकीचा फोन आला. हा फोन सोमवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास आला आणि फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. (हेही वाचा - Chhagan Bhujbal Death Threat: छगन भुजबळ यांना धमकीचा फोन, पुणे पोलीसांकडून आरोपी अटकेत)
मला 50 हजार रुपये द्या, नाहीतर मी तुम्हाला जीवे मारिन, असं आरोपीने म्हटलं आहे. आरोपीने पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. अशाच धमक्या छगन भुजबळ यांनाही दिल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे, गुन्हा नोंदवला आहे. धमक्यांना जबाबदार असलेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.