Chhagan Bhujabal (Photo credit- FB)

Chhagan Bhujbal Death Threat: राज्याभरात राजकिय भुकंपाने खळबळ उडाली असताना मंत्री छगन भुजबळ यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना त्यांच्या कार्यालातील एका कार्यकर्तांच्या फोनवरुन फोन आला. आणि त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. सोमवारी पुणे पोलीसांनी या प्रकरणात दखल घेत त्या अज्ञात व्यक्तीला अटक केले आहे.

चौकशी दरम्यान समोर आले की, धमकी देणारा व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत होता. दरम्यान त्याला कोणाकडून तरी सुपारी मिळाल्याचे त्यांने कबुल केले आहे. छगन भुजबळ सोमवारी पुण्याच्या कार्यलयात गेले होते. या प्ररणाची तात्काळ माहिती छगन भुजबळ यांनी पुणे  पोलीसांना दिला. पुणे पोलीसांनी लक्ष ठेवून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले.  प्रशांत पाटील असे त्या अज्ञात व्यक्तीचे नाव असल्याचे चौकशी दरम्यान समोर आले.

प्रशांत हा मुळचा कोल्हापुरचा आहे. चौकशी दरम्यान तो मद्यधुंद असल्याचे पोलीसांनी प्राथमिक माहिती दिली आहे. या प्रकरणात महाडमधून त्याला पुणे पोलीसांनी अटक केले. पुण्यातील एका कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी हजेरी लावली. संध्याकाळच्या कार्यक्रमात त्यांना एका कार्यक्रत्याच्या फोन वरून कॉल आला. हा कॉल खरतर छगन भुजबळ यांच्या फोनवर  आला असता परंतू फोन नंबर हा त्या कार्यकर्ताच्या फोनवर डायवर्ट केला. त्यामुळे तो फोन कार्यकर्तांच्या फोन वर आला. जीवे मारण्याची धमकी दिली. अटक केल्यानंतर तुम्हाला मारण्याची सुपारी दिली आहे ही माहिती समोर आली आहे.  पुणे पोलीस या प्रकरणात आणखी तपास करत आहे. तर छगन भुजबळ यांच्या सुरक्षतेत वाढ करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.