Mumbai Police -( photo credit-ANI)

Threat Call to Mumbai Police: दिवसेंदिवस अज्ञात फोन कॉल वरून मुंबई पोलीसांना (Mumbai Police) धमकीचे फाेन येत राहतात. कंट्रोल रुम मध्ये पुन्हा पोलीसांना एका अज्ञात व्यक्तीने फोन केल्याचे समोर आले. त्या फोन कॉलवरून पोलिसांना धमकीचा मेसेज मिळाला. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.  मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणणार असा धमकीचा मेसेज देण्यात आला. मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला या ठिकाणी उद्या  24 जून 2023 संध्याकाळी सुमारे साडेसहाच्या दरम्यान स्फोट करण्याची धमकी या फोन कॉलवरून देण्यात आली.

मुंबई पोलिसांनी युपी पोलीसांच्या मदतीने ह्या अज्ञात व्यक्तीला पकडण्यात आले. युपी पोलीसांच्या मदतीने त्या अज्ञात व्यक्तीला मुंबईत आणण्यात आले आहे. अज्ञात व्यक्तीचे  खरं नाव अजून समोर आले नाही. पोलीस यासंदर्भात आणखी तपास सुरु करतात. कॉल करण्याचा हेतू अजूनही समोर आले नाही.

पोलिसांना हा कॉल काल सकाळी 10 च्या दरम्यान आला होता. त्यादरम्यान त्याने उद्या संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास कुर्ला आणि अंधेरी ह्या गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली.

अज्ञात व्यक्तीने पोलिसांना फोन वरून दिली ही माहिती 

पोलिसांना फोन  वरून दोन लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले. ही रक्कम मिळाल्यास बॉम्बस्फोट थांबवू शकतो. त्याचप्रमाणे पुण्यातही बॉम्बस्फोट होणार आहे, तो स्वत: हा बॉम्बस्फोट घडवून आणतोय, ह्या कामासाठी त्याला दोन कोटी रुपये मिळाले आहेत. दोन लाख मिळाल्यास तो हे काम करणार नाही आणि माझ्या इतर सहकारांसोबत मलेशियाला रवाना होईल, असा दावा करत अज्ञात व्यक्तीने फोन केला आहे.