Mumbai Police (Photo Credits: PTI)

Mumbai Police Receives Threat Call: मुंबई पोलिसांना (Mumbai Police) पुन्हा एकदा अज्ञात व्यक्तीचा धमकीचा कॉल (Threat Call) आला आहे. मुंबई शहरात तीन दहशतवादी घुसल्याचा दावा या कॉलरने केला आहे. यानंतर पोलिस यंत्रणा अलर्टमोडवर आहे. दुबईवरुन शुक्रवारी पहाटे तीन अतिरेकी मुंबईत आले असून त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा दावा कॉलरने केला आहे. यासंदर्भात एबीपी माझाने वृत्त प्रकाशित केलं आहे. पोलिस या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. या व्यक्तीने पोलिसांना मुंबई शहरात दुबईवरुन शुक्रवारी पहाटे तीन अतिरेकी आले असून त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा दावा केला. तसेच या कॉलरने यातील एका दहशतवाद्याचे नाव मुजीब सय्यद असल्याचे सांगत त्याचा मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबर देखील दिला. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (हेही वाचा - Baramati Bus Accident: बारामतीत बस रस्त्यावरून उलटली; एकाचा मृत्यू, 22 जण जखमी)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना सतत धमकीचे फोन कॉल्स येत आहेत. या कॉलरचा तपास केल्यानंतर या व्यक्ती मनोरुग्ण किंवा मद्यधुंद असताना त्यांनी फोन कॉल केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे यावेळी देखील असाचं प्रकार असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

तथापी, मुंबई पोलिसांनी संबंधित कॉलरने दिलेल्या दहशतवाद्याचे नाव, गाडीता नंबर यावरून पुढील तपास सुरू केला आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांना अनेकदा धमकीचे फोन आले आहेत. मात्र, हे फोनकॉल्स फेक असल्याचं समोर आलं आहे.