General Motors Plant: पुणे येथील जनरल मोटर्स प्लांट होणार बंद, सुमारे 1800 कर्मचाऱ्यांसमोर रोजी-रोटीचा सवाल
General Motors Plant | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पुणे जिल्ह्यातील तळेगाव एमआयडिसी (Talegaon MIDC) येथील जनरल मोटर्स (General Motors) गेली अनेक वर्षे अनेक कामगारांच्या हाताला काम देत आहे. मात्र, हाच प्लांट आता कायमचा बंद होण्याच्या मार्गावर आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसाह भारत-चीन संघर्षाच्या (India-China Tension) पार्श्वभूमीवर हा प्लांट बंद होणार आहे. सांगितले जात आहे की, तोंडावर आलेल्या नाताळ (Christmas) सणापूर्वीच जनरल मोटर्स आपला प्लांट बंद करणार आहे. गेल्या गुरुवारपासून या प्लांटमधील उत्पादन बंद करण्यात आले आहे. सेवेत असलेल्या कंत्राटी कामगारांनाही काढून टाकण्यात आल्याचे समजते.

पुणे जिल्ह्यातील तळेगाव औद्योगिक वसाहत (Talegaon MIDC) परिसरात असलेला जनरल मोटर्स (General Motors) प्लांटमध्ये सुमारे 1800 कामगार काम करतात. गेल्या प्रदीर्घ काळापासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या टाटा मोटर्सने आपला हा प्लांट विकण्यासाठी चीनी कंपनी ग्रेट वॉल मोटर्स यांच्यासोबत व्यवहार केला आहे. परंतू, भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने या व्यवहारांना परवानगी दिली नाही. कंपनीला आशा होती की, 2020 या वर्षाच्या अखेर या तणावावर तोडगा निघेल. परंतू, अद्याप तरी असे घडले नाही. परिणामी हा व्यवहार अद्यापही प्रलंबित असल्याचे समजते. (हेही वाचा, Business Ideas For Unemployed People: नोकरी गेली? नो टेन्शन! बेरोजगार महिला, पुरुषांसाठी 10 बिझनेस आयडिया)

प्राप्त माहितीनुसार, कंपनीने म्हटले आहे की, कंपनी कर्मचाऱ्यांच्या भविष्याची पूर्णपणे काळजी घेणार आहे. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना पुढच्या महिन्यापर्यंत आर्थिक सहकार्य करेन.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, लद्दाखमध्ये चीन आणि भारत यांच्यात निर्माण झालेल्या तणावनंतर भारत सरकारने शेजारील राष्ट्रांच्या देशातील गुंतवणुकीबाबत नियम कडक केले. केंद्र सरकारने चीन विरुद्ध आर्थिक मोर्चेबांधणी करताना अनेक व्यवहारांची पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरु केली. सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये चीनी सामनानांवर बंदी घातली आहे.

दरम्यान, जनरल मोटर्सचा गुजरातमध्येही एक प्लांट होता. 2017 हा प्लांट SAIC या चीनी कंपनीला विकण्यात आला. आता हा प्लांट एमजी मोटर्स (MG Motors) वापरत आहे.