Gautami Patil Bail: डान्सर गौतमी पाटीलची अखेर अटकेपासून सुटका झाली आहे. अहमदनगरमध्ये गणेशोत्सव कार्यक्रमात नियम मोडल्याच्या आरोप गौतमी पाटीलवर करण्यात आला होता. त्यात आता तिला अहमदनगर कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पोलिसांची परवाणगी नसतानाही हा कार्यक्राम झाला होता. त्यावेळी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप गौतमीवर झाला होता. त्याबाबत सुनावणी झाली आहे. सुनावणीत कोर्टान अटी आणि शर्तींसह गौतमीला जामीन मंजूर केला. डान्सर गौतमी पाटील आणि वाद हे एक समीकरणच झालं आहे. गौतमी तिच्या मिक्स डान्स स्टाईलमुळे प्रसिद्ध झाली. तिच्या लावणीवरून तिला मोठमोठ्या लावणी सम्राज्ञींनींनी तिच्यावर टिका केली होती. त्यामुळे गौतमी पाटील अल्पावधित प्रसिद्धीच्या झोतात आली. (हेही वाचा:Gautami Patil Fall on Stage: अरेरे..! गौतमी पाटील नाचता नाचता अडखळली अन स्टेजवरच पडली (Watch Video) )
तिच्या डान्सच्या कार्यक्रमाला तरुणांची तुफान गर्दी होते. तिच्या कार्यक्रमात देखील हुल्लडबाजांकडून चुकीच्या घटना घडल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे तिच्या कार्यक्रमाला गालबोट लागलेलं बघायला मिळतं. एकदा तर तिच्या कार्यक्रमाला इतकी गर्दी झाली की काही जण जिल्हा परिषद शाळेच्या कौलांवर जावून कार्यक्रम पाहत होते. यावेळी एक जण कौलावरुन थेट जमिनीवर कोसळला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला होता.(हेही वाचा:Gautami Patil: उदगीर येथे गौतमी पाटील हीच्या कार्यक्रमात प्रेक्षकांचा तुफान राडा, प्रेक्षकाच्या डोक्याला दगडाचा मारा )
नेमकं प्रकरण काय?
अहमदनगरमध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी असाच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी नाकारली होती. पण तरीही कार्यक्रम पार पडला होता. हाच कार्यक्रम गौतमीला भारी पडला. तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गौतमी पाटील हिला आज शेवटी अहमदनगर जिल्हा न्यायालयात हजर राहावं लागलं. न्यायालयाच्या आदेशानुसार कोर्टात हजर राहणं अनिवार्य आहे. अन्यथा कोर्टाकडून वॉरंटदेखील निघू शकतं असं कोर्टाकडून सांगण्यात आलं होतं. पण तसं काही घडलं नाही. त्याआधीच गौतमी आज कोर्टात हजर झाली. न्यायमूर्तींनी तिची बाजू एकून घेत तिला अटी-शर्तींच्या आधारावर जामीन मंजूर केला.