Ganpati Festival Special Trains for Kokan: येत्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तसेच काहीजण गणपतीपूर्वीच रेल्वेचे तिकिट 2-3 महिने बुकिंग करुन ठेवतात. त्यामुळे ऐनवेळी आरक्षित तिकिट नसल्यास प्रवासावेळी गर्दीमुळे फार तारांबळ होते. मात्र आता लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान कोकणात जाण्यासाठी 11 एसी डबल डेकरची सोय करण्यात आली आहे.
गणपतीवेळी कोकणात जाण्यासाठी होणारी गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने एसी डबल डेकर 8 ऐवजी 11 डब्यांची केली आहे. त्याचसोबत या रेल्वेला तृतीय श्रेणीमधील एसीचे 3 अधिक डबे जोडण्यात आले आहेत. तर पुढील वेळानुसार एसी डबल डेकर कोकणात जाणार असल्याचे वेळापत्रक येथे जाणून घ्या.
-लोकमान्य टिकळ टर्मिनस- मडगाव एसी डबल डेकर (11085) एक्सप्रेस 12 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान प्रत्येक सोमवारी आणि बुधवारी धावणार आहे.
-गाडी क्रमांक 11086 एक्सप्रेस 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी 11 डब्यांची एसी डबल डेकर धावणार आहे.
-गाडी क्रमांक 11099 एक्सप्रेस 10 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या दरम्यान प्रत्येक शनिवारी धावणार आहे.
-गाडी क्रमांक 11100 एक्सप्रेस 11 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर रोजी प्रत्येक रविवारी 11 डब्यांची असणार आहे.(खुशखबर! गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी विशेष 166 गाड्या, 25 मे पासून बुकिंग; जाणून घ्या वेळापत्रक)
त्यामुळे प्रवाशांनी आता वरील वेळापत्राकानुसार कोकणात जाण्याचे नियोजन करावे. तसेच कोकण रेल्वे प्रशासमाच्या वतीने लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडीसाठी चार विशेष मेल एक्सप्रेस चालवण्यात येणार आहेत. तर ही मेल एक्सप्रेस, 9 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार आहे.