Konkan Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी कोकणातील (Konkan) अनेक चाकरमानी काम करतात. या लोकांसाठी वर्षभरातील महत्वाचा काळ म्हणजे, मोठ्या थाटामाटात साजरा होणारा गणेशोत्सव (Ganeshotsav). कोकणातील व्यक्ती बाहेर कुठेही असुदे मात्र गणपतीच्या काळात हमखास आपल्या गावी तिची पावले वळतात. हीच गरज आणि होणारी गर्दी ओळखून  मध्य रेल्वे (Central Railway) मुंबई आणि पुणे इथून गणपतीच्या काळात कोकणात जाण्यासाठी 166 विशेष  मेल, एक्स्प्रेस गाड्यांची (Ganeshotsav Special Train) सोय केली आहे. या गाड्यांचे बुकिंग 25 मे पासून सुरु होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, पुणे येथून या गाडय़ा धावणार आहेत. करमाळी, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, पेडणे आणि पुढे थिविम, झाराप या स्थानकापर्यंत या गाड्या असतील.

असे असेल वेळापत्रक –

  • मुंबई ते सावंतवाडी एक्स्प्रेस

28 आॅगस्ट ते 15 सप्टेंबर (एकूण 26 गाड्या)

रात्री 12.20 ला सुटणारी ही गाडी दुसऱ्या दिवशी 2.10 ला पोहचेल.

  • मुंबई ते सावंतवाडी मेल

29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर (दर गुरुवार आणि शनिवार)

रात्री 12.20 ला सुटणारी ही गाडी दुसऱ्या दिवशी 2.10 ला पोहचेल.

  • मुंबई-रत्नागिरी-पनवेल

28 आॅगस्ट ते 16 सप्टेंबरपर्यंत

मुंबई-रत्नागिरी गाडी सीएसएमटीहून सकाळी 11.30 ला सुटणारी ही गाडी, रत्नागिरीला रात्री 10 ला पोहचेल. (हेही वाचा: मुंबई पुणे आणि कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेन्सला जोडले जाणार अत्याधुनिक LHB Coaches, प्रवास होणार अधिक सुसाट आणि सुरक्षित)

  • पनवेल-सावंतवाडी-मुंबई

29 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर

ही गाडी पनवेल येथून स. 7.50 वाजता सुटणार असून सावंतवाडी येथे रात्री 10 ला पोहोचेल.

इतर गाड्या –

  • लोकमान्य टिळक टर्मिनस ते पेरणे आणि झाराप
  • पनवेल-सावंतवाडी
  • पनवेल-थिवीम
  • पुणे-रत्नागिरी व्हाया कर्जत-पनवेल
  • पुणे-करमाळी
  • पनवेल-सावंतवाडी

    या विशेष फेऱ्याही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.  त्यामुळे तुम्हीही तुम्हीही गणपतीला कोकणात जाणार असाल, तर या वेळापत्रकानुसार आपले आरक्षण करू शकता.