कुख्यात गुंड अरुण गवळी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रकृती उत्तम, जावई अक्षय वाघमारे याने दिली माहिती
अरुण गवळी (Photo Credits-Facebook)

कुख्यात गुंड अरुण गवळी (Arun Gawali)  यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांची प्रकृती खालावली गेली आहे. त्यामुळे गवळी यांना उपचारासाठी ट्रॉमा रुग्णालात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गवळी यांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. अरुण गवळी हे नागपूर मधील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. तर कोरोनाची लागण झाल्याने त्यांची प्रकृती सातत्याने खालावली जात आहे असे सांगण्यात आले होते. परंतु आता अभिनेता आणि अरुण गवळी यांचा जावई अक्षय वाघमारे याने अरुण गवळी यांची प्रकृती उत्तम असल्याचे  सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले आहे. (गँगस्टर अरुण गवळी याला हायकोर्टाचा दणका, पॅरोल वाढवून मिळणार नसल्याने तळोजा जेलला सरेंडर होण्याचे निर्देशन)

अक्षय वाघमारे याने त्याच्या इन्स्टाग्रामवरील स्टोरीत अरुण गवळी यांच्या प्रकृती बद्दल माहती  दिली आहे. त्याने असे म्हटले आहे की, अरुण गवळी यांना कोरोना झाला आहे. पण त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यामुळे मीडियात जे काही पसरत आहे ते खर नाही आहे. त्यामुळे त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू असे आवाहन ही अक्षय वाघमारे याने केले आहे.

अरुण गवळी यांची प्रकृती स्थिर (Photo Credits-Instagram)

अरुण गवळी यांना कोरोनाची लागण झाली असता त्यांच्या सोबतच्या कैद्यांची सुद्धा कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यात गवळी यांच्यासह अन्य पाच कैद्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.(नागपूर: हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विकी नगराळे याचा आत्महत्येचा प्रयत्न?)

याआधील अरुण गवळी यांना पत्नीच्या आजारपणासाठी 45 दिवसांसाठी पॅरोलवर नागपूर तुरुंगाबाहेर सोडण्यात आले होते. एप्रिल महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 27 एप्रिलला त्याने कारागृहात हजर होणं अपेक्षित होतं. पण याचवेळी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला. त्यामुळे अरुण गवळीने अर्ज करत पॅरोल वाढवण्याची मागणी केली होती. यावेळी न्यायालयाने अर्ज स्वीकारत 10 मे पर्यंत अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये वाढ केली होती. यानंतरही अरुण गवळीला वाढ देत 24 मे पर्यंत पॅरोल देण्यात आला होता. दरम्यान पॅरोलवर बाहेर असताना अरुण गवळीची योगिताचा विवाहसोहळा अभिनेता अक्षय वाघमारे याच्यासोबत पार पडला होता.