Hinganghat Case | Representational Image (Photo Credits: Facebook)

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विकी नगराळे (Vicky Nagrale) याने काल (19 फेब्रुवारी) कारागृहामध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.अशा प्रकारची चर्चा जोर धरत आहे. दरम्यान नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये असलेल्या विकीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त जेल प्रशासनाकडून नाकारण्यात आले आहे. जेलमध्ये थंडीपासून बचावण्यासाठी विकीला देण्यात आलेल्या ब्लॅंकेटच्या चिंधीने गळफास लावण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान ब्लॅंककेट फाडून त्याची चिंधी बराकीमधील गजाला बांधून ती गळ्याला बांधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार कारागृहाजवळ तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने विकीच्या गळ्याभोवती असलेला फास ढिला केला त्यानंतर विकीला कारागृहाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, विकीच्या आत्महत्येचे वृत्त प्रशासनाकडून फेटाळण्यात आले आहे. हिंगणघाट प्रकरण: आरोपीला लवकरात-लवकर फासावर लटकवू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.  

 

विकी नगराळे याला पंधरादिवसांपूर्वी हिंगणघाट परिसरामध्ये नंदोरी चौकामध्ये एकतर्फी प्रेमातून तरूणीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान गंभीर स्वरूपात जखमी झालेल्या या तरूणीने पुढील काही दिवस मृत्यूशी झुंज दिली. अखेर 10 फेब्रुवारी दिवशी तिचा मृत्यू झाला. हिंगणघाट जळीतकांडानंतर पीडितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना नागरिकांमध्ये असंतोष होता. आरोपीला कडक शासन करण्याची मागणी गावकर्‍यांनी प्रशासनाकडे केली आहे. सोबतच या शिक्षेवर तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे अशी मागणी आता जोर धरत आहे.

विकी नगराळे याला अटक केल्यानंतर सध्या त्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती आज त्याच्या या न्यायालयीन कोठडीची मुदत संपत आहे. एकतर्फी प्रेमातून प्रेयसीला जाळण्यचा प्रयत्न करणार्‍या विकीने काही दिवसांपूर्वी 'मला जिवंत राहण्याचा अधिकार नाही मला गोळ्या मारून ठार करा' असा संताप देखील व्यक्त केला आहे. दरम्यान त्याच्या जीवाला असणारा धोका पाहता 12 फेब्रुवारी दिवशी त्याला वर्धा कारागृहातून हलवून नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये हलवण्यात आले आहे.