Ganeshotsav 2021: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना 'या' नियमांचे पालन करावे लागणार
Sankashti Chaturthi June 2020 | (Photo Credits: Pixabay)

Ganeshotsav 2021:  देशभरासह राज्यात अद्याप कोरोनाची परिस्थिती कायम असून कोविड19 चे नवे वेरियंट सुद्धा समोर येत आहेत. त्यामुळे राज्यात अशा स्थितीत सण अत्यंत साधेपणाने साजरे करावेत असे राज्य सरकारने जाहीर केले आहेत. याच पार्श्वभुमीवर अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी काही नियम लागू केले आहेत. त्यानुसार ज्यांनी कोरोनाच्या लसीचे दोन डोस घेतलेल्यांना त्या संदर्भातील चाचणी केली जाणार नाही आहे. मात्र ज्या नागरिकांनी लसीचे डोस पूर्ण केलेले नाहीत त्यांची कोरोनाची चाचणी केली जाणार आहे.(Ganeshotsav 2021 Guidelines: घरगुती गणपतीची मूर्ती 2 फूटांची असावी; 'गणेशोत्सवा'साठी राज्य सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना)

परंतु कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना विलिगिकरणात ठेवण्यात येणार आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तासांपूर्वीचे आरटीपीसीआर चाचणी केल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना सुद्धा याच नियमांचे पालन करावे लागणार आहे.(केरळ-महाराष्ट्रातील Covid-19 प्रकरणांनी केंद्राची वाढवली चिंता; राज्यांना लिहिले पत्र, दहीहंडी आणि गणेशोत्सवासाठी उपयोजना करण्याचा सल्ला)

महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक गावात सार्वजनिक गणपती मंडळे अगदी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करतात. या दहा दिवसांमध्ये पुण्या-मुंबई सारख्या शहरांचे तर संपूर्ण रूपच पालटते. मात्र यंदाही अशा मंडळांवर अनेक मर्यादा आल्या आहेत. त्याचसोबत कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासह गर्दी होणार नाही याची ही खबरदारी घ्यावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.