Ganeshotsav 2021: ‘Lalbaugcha Raja’ च्या प्राणप्रतिष्ठेला विलंब; स्थानिकांसोबत पोलिसांच्या सकारात्मक चर्चेनंतर सुवर्णमध्य काढण्यात यश
लालबागचा राजा 2021 । PC: Instagram

आजपासून गणेशभक्तांमध्ये गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे. पण कोविड निर्बंधांमध्ये सण साजरा करताना मंडळांची देखील कसरत होत असल्याचं चित्र आहे. मुंबईत लालबागच्या राजा (Lalbaugcha Raja) यंदा 4 फूटाच्या मूर्तीमध्ये विराजमान होणार आहे. पण सकाळी 10.30 ची मुखदर्शनाची वेळ देऊन ही अद्याप 2 तास उलटले तरीही प्राणप्रतिष्ठापनेच्या पूजेला सुरूवात न झाल्याने अनेक जण गोंधळले होते. पण काही वेळापूर्वीच मुंबई पोलिस (Mumbai Police) आणि स्थानिक यांच्याशी चर्चा करून सुवर्णमध्य काढण्यात यश आलं आहे. Lalbaugcha Raja 2021 Live Darshan: लालबागचा राजा गणपती लाईव्ह दर्शन इथे पाहा.

दरम्यान मुंबईमध्ये कलम 144 लागू केल्याने लालबागचा राजा विराजमान असलेल्या गल्लीमधील दुकानं बंद ठेवण्याचे पोलिसांचे आदेश होते. पण दुकानदारांना हा फटका का? असा सवाल उपस्थित झाल्यानंतर आता पोलिसांनी या गल्लीतील दुकानदार आणि त्याच्या नोकराला पास दिला जाईल आणि केवळ तितक्याच लोकांना गल्लीतून आत प्रवेश दिला जाईल असं सांगितलं आहे. सध्या लालाबागच्या राजाच्या गल्लीला पोलिस छावणीचं रूप आलं आहे. अनावश्यक गर्दी आढळल्यास पुन्हा कलम 144 लागू केले जाईल असा इशारा देखील विश्वास नांगरे पाटील यांनी दिला आहे. Ganeshotsav 2021: गणेशोत्सवात सूचनांचे पालन करण्याचे मुंबई मनपाने केले आवाहन.

लालबागचा राजा हा मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक मंडळांपैकी एक आहे. त्यामुळे सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंतची गर्दी पाहता यंदा आरतीच्या वेळेस केवळ 10 जणांनाच मंडपात परवानगी दिली जाईल अन्य सार्‍यांना घरूनच ऑनलाईन दर्शन घेण्याचं आवाहन पोलिसांनी पुन्हा केलं आहे. त्यामुळे राजाची खोळंबलेली प्राणप्रतिष्ठापना पूजा आता दुपारी 12.30 च्या नंतर सुरू होईल असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

लालबागचा राजा ऑनलाईन दर्शन आजपासून अनंत चतुर्दशी दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत त्यांच्या सोशल मीडीया प्लॅटफॉर्म्सवर, अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध राहणार आहे. आजपासून मुंबई मध्ये अनंत चतुर्दशी पर्यंत कलम 144 अंतर्गत जमावबंदीचे आदेश आहेत. हा निर्णय कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या अनुषंगाने घेण्यात आला आहे.