गणेशोत्सवादरम्यान आता चाकरमान्यांना मुंबई, पुणे सोबतच गुजरात मधूनही कोकणात जाण्यासाठी 3 विशेष ट्रेन्स चालवण्यात येत आहेत. आता यामध्ये महाराष्ट्रात पालघर स्थानकामध्येही या ट्रेन्सला थांबा देण्यात आला आहे. गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) पार्श्वभूमीवर गुजरात मधून अहमदाबाद-कुडाळ (Ahemadabad-Kudal), अहमदाबाद - सावंतवाडी (Ahemadabad - Sawantwadi) आणि वडोदरा - रत्नागिरी (Vadodara - Ratnagiri) अशा तीन विशेष ट्रेन्स चालवल्या जात आहेत. त्याच्या 12 फेर्या गणेशभक्तांसाठी चालवल्या जाणार आहेत. (Ganeshotsav 2020 Special Train: गणेशोत्सव साठी मध्य रेल्वे CSMT/LTT वरुन कोकणात सोडणार 162 ट्रेन).
पश्चिम रेल्वेकडून पूर्वी देण्यात आलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेवरील या 3 ट्रेन्स वडोदरा, सूरत, वापी, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, सावरडे, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग या स्थानकांमध्ये थांबतील आता त्यामध्ये पालघर स्थानकाची समावेश करण्यात आला आहे. Ganpati Special Trains: गुजरात हुन कोकणासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे सोडणार गणपती स्पेशल ट्रेन, तिकिट बुकिंगची वेळ, तारिख जाणुन घ्या.
पश्चिम रेल्वे ट्वीट
यात्रियों की सुविधा के लिए पश्चिम रेलवे की गुजरात से चलने वाली तीन #गणपति विशेष ट्रेनों को पालघर स्टेशन पर अतिरिक्त ठहराव का निर्णय। #Ganeshotsav #GaneshChaturthi2020 pic.twitter.com/edGyHqXNPr
— Western Railway (@WesternRly) August 19, 2020
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संकटामध्ये पुरेशी खबरदारी घेऊन रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आता आंतर जिल्हा एसटी सेवा देखील सुरू झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात गावी कोकणात जाणार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्या गणेशोत्सवासाठी महाराष्ट्रात पश्चिम रेल्वे कडून मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकातून तर मध्य रेल्वे कडून सीएसएमटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस वरून 162 विशेष गाड्या सुरू झाल्या आहेत.