भारतीय रेल्वेने (Indian Railway) गणपती विशेष गाड्या (Ganpati Special Train) सोडण्यासाठी परवानगी दिली असुन आता गुजरात (Gujrat) मधुन महाराष्ट्रातील कोकण (Konkan) विभागात जाणार्या लांंब पल्ल्याच्या गाड्या सुरु होणार आहेत, प्राप्त माहितीनुसार मध्य (Central Railway) आणि पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) संयुक्त विद्यमाने या ट्रेन सोडल्या जातील. सध्याचे वेळापत्रक पाहता 18 ते 25 ऑगस्ट दरम्यान ट्रेन्सचे प्लॅनिंंग केलेले आहे. अहमदाबाद (Ahemdabad) येथुन सकाळी 9 वाजुन 30 मिनिटांनी ट्रेन सोडल्या जातील ज्या दुसर्या दिवशी संध्याकाळी 4 वाजुन 30 मिनिटांनी कुडाळला पोहचतील. गणपती दरम्यान मुख्यतः वडोदरा व अहमदाबाद येथुन रत्नागिरी (Ratnagiri), कुडाळ (Kudal) , सावंतवाडी (Sawantwadi), या ठिकाणी जाणार्या प्रवाशांची संख्या अधिक असते हीच बाब लक्षात घेता येउन या खास ट्रेन सोडण्यात येणार आहेत. तसेच परतीच्या प्रवासासाठी 19 ते 26 ऑगस्ट दरम्यान कुडाळ- अहमदाबाद अशा गाड्या चालवल्या जातील. (Ganeshotsav 2020 Special Train: गणेशोत्सव साठी मध्य रेल्वे CSMT/LTT वरुन कोकणात सोडणार 162 ट्रेन)
रेल्वे कडुन जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार या गणपती विशेष गाड्यांंना वडोदरा, सूरत, वापी, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, सावरडे, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग स्थानकांंवर हॉल्ट असेल. या ट्रेन्स पुर्णतः आरक्षित असतील ज्यांंच्या तिकिटासाठी 17 ऑगस्ट पासुन सुरुवात होणार आहे. आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईट वर आपण तिकिट बुकींंग करु शकता.
दरम्यान महाराष्ट्रात सुद्धा मध्य आणि पश्चिम रेल्वे कडुन गणपती विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत.पश्चिम रेल्वे च्या गणेशोत्सवासाठी स्पेशल ट्रेन मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथून धावणार आहेत. तर मध्य रेल्वे कडुन सीएसएमटी व लोकमान्य टिळक टर्मिनस वरुन ट्रेन सोडल्या जातील.