Ganesh Chaturthi Special Trains: पश्चिम रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी चालवल्या जाणार 5 स्पेशल रेल्वेगाड्या; येत्या 16 ऑगस्टपासून तिकिट बुकिंगला होणार सुरुवात, येथे पहा ट्रेनची यादी
Indian Railway (Photo Credits-Pixabay)

पश्चिम रेल्वेकडून (Western Railway) गणेशोत्सवासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणांच्या येथून स्पेशल ट्रेन चालविल्या जाणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या अधिकृत प्रेस परिपत्रकात असे म्हटले आहे की, गणेशोत्सवासाठी स्पेशल ट्रेन मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथून धावणार आहेत. परंतु या स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करण्यापूर्वी नागरिकांना तिकिट बुकिंग करावी लागणार आहे. गाडी क्रमांक 09001, 09007, 09009, 09011 & 09061 हे असणार असून 16 तारखेपासून नागरिकांना तिकिटे ही सर्व पीआरएस काउंटर्स आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरुन बुक करावी लागणार आहेत.

गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेच्या स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून गर्दी कमी होईल अशी अपेक्षा करण्यात आली आहे. एकूण 5 स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार असून त्याच्या 20 फेऱ्या होणार आहेत. दोन स्पेशल ट्रेन मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी रोड, आणखी दोन वांद्रे टर्मिनस ते सावंतवाडी रोड आणि एक वांद्रे टर्मिनस ते कुडाळ अशी धावणार आहे.(Ganeshotsav 2020 Special Train: गणेशोत्सव साठी मध्य रेल्वे CSMT/LTT वरुन कोकणात सोडणार 162 ट्रेन, पहा वेळापत्रक, कधी आणि कसे कराल बुकिंग?)

यंदाचा गणेशोत्सव सण येत्या 22 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. तर गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक आपल्या गावाला जातात. खासकरुन मुंबईसह अन्य शहरातून नागरिक गणेशोत्सवासाठी कोकणात जातात. परंतु सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने नागरिकांना आपल्या गावाला गेल्यास 10 दिवस क्वारंटाइन करण्यात येणार असल्याचा निर्णय घोषित केला आहे.