मध्य रेल्वे ने (Central Railway) गणेशोत्सव (Ganeshotsav 2020) निमित्त कोकणात जाऊ इच्छिणार्यांसाठी एक आनंदाची माहिती दिली आहे. बर्याच प्रतिक्षेनंंतर आता मध्य रेल्वेने CSMT, LTT वरून कोकणासाठी 162 गाड्या सोडणार असल्याची घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सावंतवाडी रोड / कुडाळ / रत्नागिरी दरम्यान 162 विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. यासाठी उद्या म्हणजेच 15 ऑगस्ट पासुन IRCTC च्या ऑफिशियल वेबसाईट वरुन बुकिंग करता येणार आहे. या गाड्यांंमधुन प्रवेश करण्यासाठी रिजर्व्हेशन करणे अनिवार्य असणार आहे, प्रवासाच्या दरम्यान प्रवाशांंनी कोरोना व्हायरस काळात पाळावयाच्या सर्व सुचना आणि खबरदारी काटेकोरपणे पाळायच्या आहेत असे रेल्वे तर्फे सुचित करण्यात आले आहे.
गणेशोत्सव निमित्त कोकणात जाणार्या विशेष ट्रेन्सचे वेळापत्रक मध्य रेल्वे तर्फे जाहीर करण्यात आलेले आहे. हे संंपुर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
गणेशोत्सव निमित्त कोकणात जाणार्या ट्रेनसाठी कसे कराल बुकिंग?
- कोकणात जाणार्या ट्रेन्स साठी 13 स्लीपर कोच, 6 सेकेंड क्लास बोगी, 1 AC-2 Tier, 4 AC-3 Tier कोच असणार आहेत. यापैकी तिकिट बुकिंग करायचे आहे.
- 15 ऑगस्ट पासुन तिकिट बुकिंग सुरु होईल
-www.irctc.co.in या अधिकृत वेबसाईट वर बुकिंंग करायचे आहे.
दरम्यान, मागील अनेक दिवसांपासुन गणेशोत्सवात कोकणात जाणार्या गाड्यांंचा मुद्दा प्रलंबित होता. आजच मध्य रेल्वे तर्फे सकाळी यासंदर्भात एक परिपत्रक जाहीर करुन कोकणात विशेष गाड्या सोडण्याची तयारी आहे मात्र राज्य सरकारकडुन अद्याप परवानगी नसल्याने हे काम ठप्प आहे अशी माहिती देण्यात आली होती.