Anant Chaturdashi 2019: गणेश विसर्जनासाठी बदलण्यात आले मुंबईतील वाहतूकीचे मार्ग, ट्विटच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सादर केला नकाशा
Ganesh Visarjan (Photo Credits: Instagram)

अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) निमित्त उद्या म्हणजेच गुरुवारी संपुर्ण मुंबईत 11 दिवसाच्या गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा पाहायला मिळेल. या विसर्जनसाठी मुंबई पोलीस सज्ज झाले असून गणेश विसर्जनात (Ganesh Visarjan) कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) विशेष तयारी केली आहे. या विसर्जनासाठी मुंबईत 50 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहे. तसेच वाहतुकीत बाधा येऊ नये म्हणून 12 सप्टेंबरला वाहतुकीचे मार्गही बदलण्यात आले आहे.

मुंबईत 129 ठिकाणी बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे. गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, जुहू चौपाटी, अक्सा बीच, वर्सोवा बीच आणि मार्वे बीच येथे मोठ्याप्रमाणावर गणेश विसर्जन करण्यात येते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कशी असेल यासाठी मुंबई पोलिसांनी ट्विट करुन मॅप शेअर केला आहे.

मुंबई पोलीस ट्विट:

विसर्जन मिरवणूकीसाठी 53 रस्ते बंद ठेवण्यात येणार आहे. तर 56 रस्त्यांवर एकाच दिशेची वाहतूक सुरु राहिल. अवजड वाहतूकीसाठी 18 रस्ते बंद ठेवण्यात आले असून 99 ठिकाणी पार्किंगला मनाई करण्यात आली आहे. भायखळ्याचा रेल्वे पूल, आर्थर रोड रेल्वे पूल, करिरोड आणि जुहू तारा पूल अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी धोकादायक म्हणून घोषित करण्यात आला आहे. १६ टनापेक्षा अधिक अवजड सामान घेऊन जाणाऱ्या वाहनांना या पुलांवरून बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा- पवई: गणेश विसर्जनादरम्यान तलावात झाले मगरीचे दर्शन, गणेशभक्तांची उडाली तारांबळ

गणेश भक्तांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच मिरवणुकांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. मुंबईतील मानाचे गणपती तसेच लालबागचा राजाच्या मिरवणुकीसाठी होणा-या गर्दीला आवरण्यासाठी मुंबईत राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रक पथक, बॉम्बशोधक आणि निरोधक पथक जवान तैनात करण्यात आले आहेत.