Naxals | (Photo Credits: ANI)

गडचिरोलीत (Gadchiroli) पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी (Naxalist) एका आदिवासी तरुणाची हत्या केली आहे. रामजी चिन्ना आत्राम असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात कापेवंचा जवळ नक्षलवाद्यांनी रामजी आत्रामची गोळ्या घालून हत्या केली. गेल्या दहा दिवसात नक्षलवाद्यांकडून निर्दोष नागरिकांच्या हत्येची गडचिरोलीतील ही तिसरी घटना आहे. रामजी आत्राम यांनी गेल्या वर्षी नक्षलवाद्यांची काही माहिती पोलिसांना पुरवली होती. त्यानंतर पोलिसांसोबत झालेल्या एका एन्काऊंटरमध्ये एका महिला नक्षलवादी मारली गेली होती असा आरोप नक्षलवाद्यांनी केला होता. यानंतर रामजी आत्राम यांच्या हत्या केली. त्या ठिकाणी तशा आशयाचे पत्रकही ठेवले आहे. (हेही वाचा - Chandrashekhar Bawankule: महाराष्ट्र हे संस्कार जपणारे राज्य; चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना इशारा, मकाऊ प्रकरणावर बोलणे टाळले)

गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या गोंगवाडा ते पेनगुंडा रोडवरील पेनगुंडा गावाजवळ ही घटना घडली आहे. लाहेरी गावातील रहिवासी असलेला दिनेश गावडे हा बुधवार 15 नव्हेंबर रोजी गावातून कामानिमित्त बाहेर गेला होता. त्या दिवशी तो घरी परतलाच नाही. आज 16 नोव्हेंबर सकाळी त्याचा मृतदेह रस्त्यावर आढळून आला असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी घटनास्थळी नक्षल्याकडून एक पत्र देखील ठेवण्यात आले आहे.