Chandrashekhar Bawankule: महाराष्ट्र हे संस्कार जपणारे राज्य; चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना इशारा, मकाऊ प्रकरणावर बोलणे टाळले

वाचळवीरांनी औकतीत बोलावे, महाराष्ट्र संस्कारमय आहे, देव, देश, धर्म संस्कृती जपणारा आहे. इतर काही बोलण्यापेक्षा राज्याच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्यासाठी बोलले पाहिजे असा सल्ला बावनकुळे यांनी दिला.

Chandrashekhar Bawankule: महाराष्ट्र हे संस्कार जपणारे राज्य; चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना इशारा, मकाऊ प्रकरणावर बोलणे टाळले
Chandrashekhar Bawankule. (Photo Credits: Twitter)

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला केला केला आहे. नाशिकच्या मालेगाव दौऱ्यावर असताना त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या टिकेचा समाचार घेतला आहे. वाचळवीरांनी औकतीत बोलावे, महाराष्ट्र संस्कारमय आहे, देव, देश, धर्म संस्कृती जपणारा आहे. इतर काही बोलण्यापेक्षा राज्याच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्यासाठी बोलले पाहिजे असा सल्ला बावनकुळे यांनी दिला. तसेच पंकजा मुंडे (Pankaja Munde) कुठेही नाराज नाहीत असंही त्यांनी सांगितलं. मात्र यावेळी त्यांनी मकाऊ प्रकरणावर बोलणे टाळले.  (हेही वाचा - Rahul Gandhi यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; भाजपचे निवडणूक आयोगाला पत्र, सोशल मीडिया अकाउंट बंद करण्याची मागणी)

पंकजा मुडे यांच्या नेतृत्वाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्या नाराजीने विरोधकांचा काही फायदा होईल असे अनेकांना वाटते. पण पंकजाताईंच्या रक्तात भाजप आहे. स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कर्तुत्वाने उभा राहिलेला महाराष्ट्रात पंकजाताई कधीही नाराज राहू शकत नाहीच. खरं तर पक्ष हा मोठा आहे. पंकजाताई पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. निश्चितपणे पंकजा ताई महाराष्ट्रात आणि देशात चांगल्या लेव्हलला नेतृत्व करतील अशी अपेक्षा असल्याचे  देखील बावनकुळे यांनी म्हटले आहे.

व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, पण एका फोटोमुळे जर कुणाची इमेज खराब करता येते असं जर एखाद्याला वाटत असेल तर ते शक्य नाही. आपण हाँगकाँगला परिवारासोबत गेलो होतो, पण त्या ठिकाणी प्रत्येक हॉटेलमध्ये कसिनो असतो, त्याला क्रॉस करून जाताना कुणीतरी तो फोटो काढल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

(The above story first appeared on LatestLY on Nov 25, 2023 06:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).