गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या नक्षलवाद्यांचा शस्त्रांचा कारखाना 70 जवानांनी केलेल्या कारवाईत उद्ध्वस्त केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. निवेदन करताना गृहमंत्री देशमुख म्हणाले, आपल्या जवानांनी केलेली ही कामगिरी अभिमानास्पद असून 70 जवानांनी 48 तासाच्या या कारवाईत नक्षलवाद्यांच्या कोअर एरियामध्ये जावून शस्त्रास्त्रांचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत एक जवान जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. ही चकमक गडचिरोलीच्या एटा पाल्ली भागात घडली. छत्तीसगड आणि गडचिरोलीच्या सीमेवर हा परिसर आहे.
गडचिरोली हा असा परिसर आहे जी नक्षलवाद्यांचा कारवाईने मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. येथे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये वारंवार चकमकी होत असतात. महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेवर कोरपर्शी जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमकी घडल्याचे सांगण्यात येत आहे. चकमकीदरम्यान काही सैनिकही अडकले होते. यानंतर त्यांना बाहेर काढण्यासाठी एअरफोर्सची मदत घेण्यात आली. पोलिस काही खेड्यांमध्ये मोहीम राबवित असताना नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला होता. (हेही वाचा: Mansukh Hiren मृत्यूचा तपास ATS कडे सुपूर्त; गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा)
सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमधील 48 तासांची चकमकी आता संपली आहे. या चकमकीत एक सी-60 कमांडो शहीद झाला, तर 1 जखमी. या कारवाईत 70 पोलिसांचा सहभाग होता. पोलीस कमांडो आणि नक्षलवादी यांच्यात दोनवेळा गोळीबार झाला. घटनास्थळ घनदाट जंगल पर्वतरांगानी वेढलेला अबुझमाडचा परिसर आहे. रात्रीपासून या भागात गडचिरोली पोलीस दलाच्या सी-60 कमांडोचे नक्षलवाद्यांच्या विरोधात अभियान सुरु होते.