Viral Video

Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेदार तर कधी भितीदायक व्हिडिओही समोर येतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती ऑक्सिजन सिलिंडरचा नट उघडत आहे आणि यादरम्यान तो सिलिंडरचा संपूर्ण नट उघडतो. हा सिलिंडर रॉकेटच्या वेगाने बाहेर जातो आणि समोरच्या दुकानाची भिंत तोडून आत शिरतो. मात्र, या काळात व्यक्ती मागे असल्याने त्याच्यासोबत कोणताही अपघात होत नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही या व्यक्तीचा निष्काळजीपणाही पाहू शकता की, समोर एक वाहन उभे आहे आणि त्यासोबत इतरही सिलिंडर ठेवलेले आहेत, तरीही तो निष्काळजीपणे सिलिंडरचा नट उघडत आहे. या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडू शकली असती.

येथे पाहा व्हिडीओ: 

हा व्हिडिओ सोशल मीडिया X वर @devgodara34 नावाच्या हँडलने शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, 'जर तुम्हाला ऑक्सिजन सिलेंडरची ताकद जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओवर लोक जोरदार कमेंट करत आहेत.