Israel-Hamas War: गाझा पट्टीतील (Gaza Strip) विस्थापित लोकांना आश्रय देणारी शाळा आणि नागरी संरक्षण केंद्राला लक्ष्य करून इस्त्रायली हवाई हल्ल्यात (Israel Attack )किमान 25 पॅलेस्टिनी (Palestine)ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. गाझा-आधारित(Gaza) आरोग्य प्राधिकरणाचे अधिकारी मारवान अल-हम्स यांनी सिन्हुआला दिलेल्या माहितीत सांगितले की, रविवारी खान युनिसमधील विस्थापित लोकांसाठी असलेल्या शाळेवर इस्रायली हवाई हल्ल्यात सुमारे 21 पॅलेस्टिनी ठार झाले. मृतांमध्ये बहुतेक महिला आणि मुले आहेत. (हेही वाचा:Israel-Hamas War: इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये 14 पॅलेस्टिनी ठार, वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती)
शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या छायाचित्रकाराने शाळेच्या वरच्या मजल्यावरील ढिगाऱ्यांमध्ये मृत आणि जखमींचे रक्ताने माखलेले मृतदेह पाहिले. या हल्ल्यावर इस्रायली लष्कराकडून तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही, असे शिन्हुआ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. मध्य गाझामध्ये, नुसीरत निर्वासित छावणीच्या मध्यभागी ठिकाणाला लक्ष्य करून केलेल्या हवाई हल्ल्यात एका पत्रकारासह नागरी संरक्षणाचे चार सदस्य ठार झाले अशीही माहिती समोर आली आहे.
पॅलेस्टिनी पत्रकारांच्या सिंडिकेटने एका प्रेस निवेदनात म्हटले आहे की मृतांमध्ये एक पत्रकार आहे, जो कतारच्या अल जझीरा टीव्हीसाठी छायाचित्रकार म्हणून काम करत होता. मात्र, इस्रायली लष्कराने त्याच्यावर गाझामधील इस्लामिक जिहाद चळवळीसाठी लष्करी कार्यकर्ता असल्याचा आरोप केला. जारी केलेल्या निवेदनात, इस्रायली सैन्याने म्हटले की, त्यांच्या हवाई दलाने "दहशतवाद्यांनी" इस्त्रायली संरक्षण दलांवर हल्ले करण्याची योजना आखण्यासाठी वापरलेल्या नुसेरात कॅम्पमधील एका जागेला लक्ष्य केले.
इस्रायलने 7 ऑक्टोबर 2023 रोजी दक्षिण इस्रायली सीमेवरून हमासच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी गाझा पट्टीमध्ये हमास विरूद्ध मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले. ज्या दरम्यान सुमारे 1,200 लोक मारले गेले. सुमारे 250 लोकांना ओलीस ठेवले गेले. गाझा पट्टीमध्ये चालू असलेल्या इस्रायली हल्ल्यांमुळे पॅलेस्टिनी मृतांची संख्या 44,976 वर पोहोचली आहे.