ग्लिडन (Gleeden) या फ्रेंच डेटिंग अॅपने (French Dating App) सोमवारी (8 मार्च) महिलांच्या डेटिंगबद्दलचा एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात 48 टक्के विवाहित महिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर शिवसेना आमदार डॉ.मनिषा कायंदे (Dr. Manisha Kayande) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कायंदे यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करत फ्रेंच डिटिंग अॅपवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास आठ लाख विवाहित भारतीय डेटिंग अॅपचा वापर करत आहेत. विवाहबाह्य संबंधांच्या डेटिंग अॅपवर ही नोंदणी करण्यात आली असून बंगळरूमधील लोकांची संख्या ही सर्वाधिक आहे.
ग्लिडन या विकृत एक्स्ट्रामॅरिटल डेटिंग अँपने एक सर्वेक्षण करून महिलांचा बदनामीकारक सर्वे केल्याची माहिती आज सभागृहात सादर केली! भारतीय महिलांना व्यभिचारी ठरवणाऱ्या फ्रेंच एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंगअँपवर भारतात बंदी घालण्याची मागणी केंद्र व महाराष्ट्र सरकारकडे केली आहे, अशा आशयाचे ट्वीट कायंदे यांनी केले आहे. हे देखील वाचा- Maharashtra Budget 2021-22: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून अर्थसंकल्पाचे कौतुक म्हणाले, 'बिनव्याजी पीक कर्ज देण्याचा निर्णय ऐतिहासिक'
ट्वीट-
ग्लिडन या विकृत एक्स्ट्रामॅरिटल डेटिंग अँपने एक सर्वेक्षण करून महिलांचा बदनामीकारक सर्वे केल्याची माहिती आज सभागृहात सादर केली! भारतीय महिलांना व्यभिचारी ठरवणाऱ्या फ्रेंच एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंगअँपवर भारतात बंदी घालण्याची मागणी केंद्र व महाराष्ट्र सरकारकडे केली आहे ! #womenpower pic.twitter.com/VMOmA5rbSs
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) March 8, 2021
डेटिंग अॅपच्या नोंदणीत 500 टक्यांपेक्षा अधिक वाढ झाली असून विवाहित मंडळी विवाहबाह्य संबंधासाठी नवा जोडीदार शोधत असल्याचे फ्रेंच ऑनलाईन डेटिंग साईटने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, दिवसेंदिवस डेटिंग अॅपची लोकप्रियता वाढत चालली आहे, अशी माहिती समोर आली आहे.