
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) हिसांचाराच्या निषेधार्थ विद्यार्थांनी गेट वे ऑफ इंडियाजवळ (Gate Way Of India) आंदोलन सुरु केली होती. गेट वे ऑफ इंडियाजवळील परिसरात आंदोलन करणाऱ्यांपैकी एका तरुणीच्या हातात फ्रि काश्मीर (Free kashmir) पोस्टर आढळल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावर आता, ते पोस्टर झळकावणाऱ्या मुलीनेच स्पष्टीकरण दिले आहे. संबंधित तरुणीने त्या पोस्टरसंदर्भात विधान करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मेहक मिर्झा प्रभू (Mehak Mirza Prabhu) असे गेट वे ऑफ इंडिया येथे फ्री काश्मीर मजकूर लिहलेला पोस्टर झळकावणाऱ्या तरुणीचे नाव आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे केलेल्या पोस्टरबाजीमुळे अधिक चर्चेत आली आहे. यावर मेहकने फेसबूकच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करुन अशा चर्चांना पूर्णविराम लावला आहे. या व्हिडिओच्या माध्यामातून मेहक म्हणाली की, मी मंगळवारी 6 जानेवारी रोजी लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाप्रमाणे गेटवे ऑफ इंडिया येथील निषेध अंदोलनात सहभागी होण्यासाठी गेली होती. त्यावेळी मला त्याठिकाणी एक खाली पडलेला पोस्टर सापडले. ज्यावर फ्री काश्मीर असे लिहण्यात आले होते. काश्मीरमध्ये इंटरनेट, मोबाईल सेवा सुरळीत व्हावी या एकमेक इच्छेखातर मी ते पोस्टर हातात घेतले होते. महत्वाचे म्हणजे, तेथील लोकांना मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे. यामुळे मी ते पोस्टर झळकावले, असे स्पष्टीकरण मेहक हिने दिले आहे. हे देखील वाचा- 'Free Kashmir' या पोस्टरमुळे राजकारण तापले; किरीट सोमय्या यांच्याकडून पोलिसात तक्रार दाखल तर, संजय राऊत यांनीही दिली संतप्त प्रतिक्रिया
मेहक मिर्झा प्रभू यांची फेसबूक पोस्ट-
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थांना एका जमावाने मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 50 लोकांचा घोळका विद्यापीठाच्या परिसरात घुसला आणि विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घोळक्याने वसतिगृहांची तोडफोड देखील केली. याच हिसांचाराच्या निषेधार्थ काही विद्यार्थांनी गेट वे ऑफ इंडियाजवळ आंदोलन सुरु केली होती.