इंदापूर (Indapur) मधील म्हसोबाची वाडीमध्ये (Mahsobawadi) 80 फूट खोल विहीरीमध्ये रिंग करण्याची काम करताना एक दुर्घटना घडली आहे. अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने चार कामगार त्याखाली दबले गेल्याची घटना समोर आली आहे. सध्या या कामगारांच्या बचावासाठी एनडीआरएफचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना बाहेर काढण्याच शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
विहिरीचा वरचा भाग मातीचा असल्यामुळे 30 फुट खोल जमिनीमध्ये सिमेंट क्रॉंकेटीकरण करण्याचे काम सुरू होते. बेलवाडी मध्ये 4 जण हे काम करताना मात्र अचानक ढिगारा कोसळला. सध्या पोकलेन मशिनच्या मदतीने ढिगारा उपसला जात आहे.
#WATCH | NDRF team deployed for rescue operation at the site where four labourers are trapped under debris after soil cave-in during the construction of a well in Mahsobawadi village of Indapur Tehsil of Pune district, Maharashtra
(Earlier visuals from the site; Video… pic.twitter.com/mUu7YK6AA2
— ANI (@ANI) August 2, 2023
मीडीया रिपोर्ट्सनुसार मातीच्या ढिगार्याखाली अडकलेल्यांची नावं सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, जावेद अकबर मुलानी,परशुराम बन्सीलाल चव्हाण आणि मनोज मारुती चव्हाण आहेत. हे कामगार 30-40 वयोगटातील आहेत. नेहमीप्रमाणे काम झाल्यानंतर संध्याकाळी ते घरी न परतल्याने शोधाशोध सुरू झाली. Samruddhi Mahamarg Thane: शाहापूरात मोठी दुर्घटना, समुध्दी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी गर्डर मजूरांच्या अंगावर कोसळली; 15 ते 20 जणांचा मृत्यू .
विहिरीजवळ त्यांच्या दुचाकी गावकऱ्यांना दिसल्या, मात्र ते चार लोक सापडले नाहीत. त्यानंतर गावकऱ्यांनी या ढिगार्याखाली हे लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली. इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी या ठिकाणी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला आहे.