Samruddhi Mahamarg Thane Collapse : PC ANI

Samruddhi Mahamarg Thane:   समुध्दी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे.  मंगळवारच्या पहाटे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना झाल्याची उघडकीस आली आहे. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथील पुलाच्या कामावेळी मजूरांच्या अंगावर गर्डर मशिन कोसळली. त्यामुळे 15 ते 20 जणांचा मृत्यू झाला आहे. चार ते पाच जण गंभीर जखमी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यापुर्वी शाहपूर येथील तिसऱ्या कामाच्या टप्याचा श्रीगणेशा केला होता.

बुलढाणा बस अपघाता नंतर पुन्हा समृद्धी महामार्गावर शहापूर येथे मोठी दुर्घटना घडली. यामध्ये आतापर्यत 15 ते 20 मजुरांचा मृत्यू झालाय. घटनास्थळी बचाव कार्य आणि पोलीसांनी धाव घेतला. जखमी रुग्णांवर उपचार चालू असल्याची माहीती मिळाली आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी  अंधार असल्याने गर्डर आणि मशिनच्याखाली नेमके किती जण दबले आहेत किंवा मृतांचा निश्चित आकडा किती आहे, हे सांगता येऊ शकत नाही.

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम जोरात सरु आहे. पहाटे समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते, दरम्यान ही दुर्देवी घटना घडल्याचे समजतेय. शाहपूर सरलांबे येथे ही घटना घडली आहे. सुरक्षेची कोणताही उपाय योजना नसल्यामुळे मजुरांचा दुर्देवी मृत्यू झालाय. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि भला मोठा स्लॅब शंभर ते नव्वद फूच उंचावरून मजूरांच्या अंगावर कोसळला. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आता पर्यंत 15 मृतदेह ताब्यात घेवून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाटेच्या अंधारात नेमके किती जणांवर स्लॅब कोसळला आहे. यांचा निश्चित पणे आकडा सांगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे पोलीसांकडून मिळालेल्या माहिती नुसार मृतांची संख्या वाढू शकते असे सांगण्यात आले आहे.