लोकसभा आणि विधानसभा निवडणुका (Vidhan Sabha Election) अगदी जवळ येऊन ठेपल्या आहेत. दुसऱ्या बाजूला शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाव आणि पक्षचिन्हाची लढाई निवडणूक आयोग आणि सुप्रिम कोर्टात (Supreme Court) सुरु आहे. अशा स्थिती राज्याचे राजकारण (Maharashtra politics) अभूतपूर्वपणे ढवळून निघाले असताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार (Sharad Pawar NCP) यांनी पक्षाच्या मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. त्यातूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचे होमपीच असलेल्या ठाणे जिल्ह्यातून जोरदार धक्का बसला आहे. अगदी निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या माजी आमदार पांडुरंग बरोरा (Pandurang Barora) यांनी शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेस 'जय महाराष्ट्र' केला आहे.
पांडुरंग बरोरा हे या आधी विधानसभा आमदार राहिले आहेत. साधारण 1080 पासून बरोरा कुटुंबीय हे शरद पवार यांच्याशी निकटवर्तीय राहिले आहेत. मात्र, सन 2019 मध्ये बरोरा यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. पुढे एकनाथ शिंदे यांनी पक्षातच बंड केल्यावर त्यांनी ठाकरेंचीही साथ सोडली. मात्र आता लोकसाभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या वेगावर स्वार होत बरोरा यांनी शिंदे यांना जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षकार्यालयात पक्षप्रवेश होणार आहे.
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन बऱ्याच घडामोडी घडत आहेत. सध्या शहापुरचे आमदार दौलत दरोडा हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. परिणामी आगामी निवडणुकीसाठी शरद पवार यांचा पक्ष तुल्यबळ उमेदवार उभा करण्याच्या विचारात असल्याचे दिसते. राजकीय घडामोडी जर यशस्वीपणे पार पडल्या तर दौलत दरोडा यांना माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या गटाकडून लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात आहे. त्यासाठी पक्ष नेत्यांची एक बैठक पार पडत आहे. ही बैठक सलग 18 ते 19 ऑक्टोबर रोजी पार पडत आहे. ज्यात कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा, माढा आणि दिंडोरी,अहमदनगर, हिंगोली, वर्धा, अमरावती, बीड, भिवंडी आणि जालना लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल.
दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचीही एक विभागीय बैठक मुंबई येथे पार पडत आहे. जी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे. वांद्रे येथील MET कॉलेजमध्ये ही बैठक पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडणार आहे.