माजी आमदार आणि भाजप नेते कृष्णा हेगडे (Krishna Hegde) यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर हातात शिवबंधन बांधत शिवसेना प्रवेश (Krishna Hegde Joine Shiv Sena) केला. कृष्णा हेगडे ( Krishna Hegde Quits BJP) यांच्या रुपात मुंबईमध्ये भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. कृष्णा हेगडे मुळचे काँग्रेसचे पुढे त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गेल्या काही काळापसून ते भाजपमध्ये अस्वस्थ होते. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई महापालिका निवडणुकीस (BMC Election) अद्याप बराच काळ बाकी आहे. तोवर भाजप (BJP), शिवसेना, राष्ट्रवादी (NCP), मनसे (MNS) आणि काँग्रेस आदी पक्षांनी आपापल्या परीने शिडात हवा भरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या जीवावर पक्षविस्तार करण्यासोबतच फोडाफोडी करुनही पक्षविस्तार करण्यावर भर दिला जात आहे.
कृष्णा हेगडे हे आगोदर विलेपार्ले मतदारसंघातून आमदार होते. सध्या या मतदारसंघात भाजपचा आमदार आहे. पराग अळवणी हे या मतदारसंघातील आमदार आहेत. या मतदारसंघात काम करण्यासाठी कृष्णा हेगडे भाजपमध्ये अग्रही होते. परंतू, त्यांना फारसा वाव मिळत नव्हता. त्यातून त्यांची अस्वस्थता वाढत गेली. परिणामी त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. (हेही वाचा, Thane Shiv Sena: 'खासदार दिलदार है…लेकिन कुछ चमचो से लोग परेशान है’; शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा देताना पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर)
विले पार्ल्याचे माजी आमदार कृष्णा हेगडे जी आणि २०१९ च्या विले पार्ले विधानसभेतील मनसेच्या उमेदवार जुईली शेंडे जी यांनी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/q4JBvqJYXa
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) February 5, 2021
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नाव्याच्या एका पार्श्वगायिकेने बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत आले होते. परंतू, पुढे कृष्णा हेगडे यांची या प्रकरणात एण्ट्री झाली आणि प्रकरणाला वेगळे वळण मिळाली. रेणू शर्मा नामक संबंधित महिलेने आपल्यालाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता, असा गौप्यस्फोट कृष्णा हेगडे यांनी केला. धनंजय मंडे यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणावर अग्रही होती. राज्यभर आंदोलन करण्याचा प्रयत्न करत होती. परंतू, कृष्णा हेगडे यांच्या गौप्यस्फोटानंतर भाजपच्या आंदोलनातील हवाच निघून गेल्याची चर्चा सुरु झाली.