माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी मंगळवारी (15 डिसेंबर) चतुश्नूंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हर्षवर्धन यांना अटक केल्यानंतर शिवाजीनगर न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, आज त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. बचाव पक्षाचे वकील झहिर खान पठाण यांनी आज पार पडलेल्या सुनावणीनंतर याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली.
“हर्षवर्धन जाधव यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. दरम्यान, त्यांची पोलीस कोठडीची मागणी राखून ठेवण्यात आली होती. परंतु, त्यांना एका दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जामिन अर्ज सादर केल्यानंतर न्यायालयाने सरकारी वकिल आणि आयओ यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. आम्हाला म्हणणे मांडण्यासाठी मुदत हवी आहे, असे सांगितले. परंतु, न्यायालयाने त्यांना उद्याच म्हणणे मांडण्यास सांगितले. जर उद्या म्हणणे मांडले नाही तर, उद्या जामिन अर्जावर सुनावणी करण्यात येईल,” असेही त्यांनी झहिर खान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हे देखील वाचा- Eknath Shinde यांच्या जीवावर बेतावं या धारणेतून काळी जादू करणार्या 2 तांत्रिकांना पालघर मध्ये अटक
प्रकरण काय आहे?
अमन चड्डा हे पुण्यातील बालेवाडी परिसरातील रहिवासी असून ते आपल्या आई-वडीलांसह सोमवारी सकाळी 8 वाजता दुचाकीने औंध येथील ब्रेमन चौकाकडे जात होते. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी अचानक आपल्या कारचा दरवाजा उघडला. त्यावेळी हर्षवर्धन यांच्यासोबत इषा बालाकांत झा देखील होत्या. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या अमन यांना हर्षवर्धन यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रारीत म्हंटले आहे.