एका बाळाने हवाई प्रवास करणाऱ्या आईच्या उदरातून इंडोनेशियाला जाणाऱ्या विमानत बुधवारी (२४ ऑक्टोंबर) जन्म घेतला. ज्यामुळे विमानचे एमरजन्सी लॅंडीगही करावे लागले. बाळ, बाळंतीनिला उपचारासाठी इस्पितळात सुखरुप पोहोचवल्यानंतर विमानाने पुढील प्रवासासाठी उड्डान घेतले. हे विमान अबू धाबी विमानतळावरुन जकार्तासाठी निघाले होते. मात्र, प्रवासादरम्यान एका महिलेने बाळाला जन्म दिल्याने या विमानाचे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एमरजन्सी लँडींग करण्यात आले.
प्राप्त माहिती अशी की, गर्भवती महिलेला विमान प्रवासादरम्यान लेबरपेन (बाळंतकळा) होण्यास सुरुवात झाली. दरम्यान, विमानातील केबिन क्रू मेंबर आणि इतर महिला प्रवाशांच्या मदतीने या महिलेचे विमानातच बाळंतपण करण्यात आले. या घडामोडी घडत असतानाच वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) अधिकाऱ्यांशी संपर्क केरुन त्याबात माहिती दिली.
माहिती मिळताच एटीसीने संवेदनशिलपणा दाखवत विमानाचे तत्काळ लँडींग करण्यास अनुमती दिली. तसेच, विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लॅंड करण्याबाबतच्या सूचना केल्या. सिग्नल मिळताच वैमानिकाने विमानाचे लॅंडींग केले. त्यानंतर विमानतळावरील अधिकारी, कर्मचारी आणि विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बाळ आणि बाळंत महिलेला जवळच्या इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. (हेही वाचा, व्हायरल व्हिडिओ :आफ्रिकेतील इंटरनॅशनल एअरपोर्टवरील 'या' कर्मचार्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव)
Etihad Airways Abu Dhabi-Jakarta flight diverted to Mumbai as a woman passenger gives birth onboard the flight. pic.twitter.com/zosDBe60Z2
— ANI (@ANI) October 24, 2018
सूत्रांची माहिती अशी की, बाळ, बाळंतीन सुखरुप पोहोचल्यानंतर विमानाने पुन्हा जकार्ताच्या दिशेने झेप घेतली.