Atal Setu (PC- X/ANI)

Atal Setu affects Fishing: अटल सेतूमुळे रस्तेमार्ग वेगवान झाले असले तरी मासेमारीवर अवलंबून असलेल्यांच्या रोजगारावर त्याचा वाईट परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. मच्छिमार संघटनेने(Fishermen Association) त्याविरोधात आवाज उठवत मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. सरकारने त्याबदल्यात नुकसानभरपाई द्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे. या याचिकेवर येत्या 28 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. अटल सेतूमुळे(Atal Setu) वाशी खाडीतील तब्बल 60 टक्के मासे कमी झाल्याचा आरोप मच्छिमार संघटनांनी केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आमच्या उत्पनात घट झाली आहे. सरकारने आम्हाला नुकसानभरपाई द्यावी, त्याबाबतची याचिका मच्छिमार संघटनेने मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे.(हेही वाचा:Cracks On Atal Setu Viral Video: अटल सेतूच्या रस्त्याची पहिल्याच जोरदार पावसानंतर दुर्दशा; नाना पटोले यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट करत मोदी सरकार वर टीका )

दाखल यांचिकेत वाशीगाव, जुहूगाव, कोपरखैराणे, घणसोली, गोठीवली, दिवा व बेलापूर येथील कोळीवाड्यांचा देखील समावेश आहे. मरी आई मच्छिमार सहकारी संस्थेच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होत आहे. 2018 पासून अटल सेतूच काम सुरू झालं. मुंबईला नवी मुंबईशी (Navi Mumbai) जोडणारा अटल सेतू 21.8 किमी अंतराचा आहे. बांधकाम सुरू झाल्यापासून मच्छीमार संघटनांनी मासेमारी घटल्याचं म्हटलं होतं. असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. (हेही वाचा:Atal Setu Construction Quality Controversy: अटल सेतून बांधकाम गुणवत्ता वाद आणि राजकारण; MMRDA चे निवदेनातून स्पष्टीकरण )

अटल सेतू दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी जोडतो. नागरिक अवघ्या 20 मिनिटांत नवीमुंबईत पोहचतात. अटल सेतू हा 21.8 किलोमीटर लांबीचा 6 लेन रोड ब्रिज आहे. त्याचा 16.5 किमी लांबीचा भाग मुंबईच्या समुद्राच्या वर आहे आणि 5.5 किमीचा भाग जमिनीच्या वर आहे. मासेमारी हा पारंपारिक व्यवसाय आहे. उत्पन्नाचं स्त्रोत आहे. गेली अनेक वर्षे आम्ही मासेमारी करत आहोत. मात्र, अटल सेतूमुळे आमच्या उपजिवेकवर परिणाम होत असल्याचे मच्छिमार संघटनांनी म्हटले आहे.

याचिकेत दाखल अहवालात सादर करण्यात आले की, 2015-16 च्या तुलनेत 2020-21 या कालावधीत मासेमारीत  59.34% घट झाली आहे.  2019-20 हंगामात, 2017-18 च्या तुलनेत मासेमारीत 60% ने घट झाली. त्यामुळे आता मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटींची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे.