Cracks On Atal Setu Viral Video: अटल सेतूच्या रस्त्याची पहिल्याच जोरदार पावसानंतर दुर्दशा; नाना पटोले यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट करत मोदी सरकार वर टीका
अटल सेतू हा मुंबई-नवी मुंबईला जोडणारा सागरी मार्ग आहे. यामुळे हा मुंबई मधून नवी मुंबईत अवघ्या 20 मिनिटांमध्ये जाता येते.
Cracks On Atal Setu Viral Video: मुंबई, नवी मुंबई आणि आजुबाजूच्या भागात काल (20 जून) जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान या पहिल्याच जोरदार पावसाने अटल सेतू वर रस्त्याला भेगा पडल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र कॉंग्रेस कडून याचा व्हिडिओ X वर व्हिडिओ पोस्ट करत मोदी सरकार वर टीका केल्याचं पहायला मिळाला आहे. 'पहिल्याच पावसात जनतेचे १७,८४३ करोड रुपये मोदींनी डुबवले. २५० रू. टोल टॅक्स आकारून निकृष्ट दर्जाच्या अटल सेतू वरून होतोय जनतेचा जीवघेणा प्रवास' म्हणत त्यांनी अटल सेतू वरील परिस्थिती समोर आणली आहे. दरम्यान जानेवारी 2024 मध्येच अटल सेतूचं लोकार्पण करण्यात आले आहे.
पहिल्याच पावसात जनतेचे १७,८४३ करोड रुपये मोदींनी डुबवले. २५० रू. टोल टॅक्स आकारून निकृष्ट दर्जाच्या अटल सेतू वरून होतोय जनतेचा जीवघेणा प्रवास !!#atalsetu #rain #roaddamaged #road #atalsetubridge #mumbai #महाराष्ट्रसरकार #bjp #shindefadnavissarkar #maharashtra #incmaharashtra… pic.twitter.com/sHrvQOm35H
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 21, 2024
VIDEO | Maharashtra Congress chief Nana Patole (@NANA_PATOLE) inspects cracks on Atal Bihari Vajpayee Sewri-Nhava Sheva Atal Setu in Navi Mumbai, Maharashtra. pic.twitter.com/VDWT95jP1I
— Press Trust of India (@PTI_News) June 21, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2024 01:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

