यंदा दिवाळीचा (Diwali) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी म्हणजे रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी हे समीकरण असतं. पण यंदा कोरोना वायरचं संकट पाहता सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिवाळीच्या सणामध्ये फटाके फोडण्यावर आणि आतषबाजीवर बंदी घातली आहे. दरम्यान 5-6 दिवसांच्या दिवाळीच्या सणात यंदा केवळ लक्ष्मीपुजन (Laxmi Pujan) म्हणजे 14 नोव्हेंबर दिवशी सायंकाळी 8-10 या वेळेत मुंबईकरांना खाजगी परिसरामध्ये फुलझडी (phooljhadi) आणि अनार (anar) उडवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र अन्य दिवशी आतषबाजीला बंदी घालत यंदा दिवाळी सजगतेने आणि सतर्क राहून साजरी करण्याचं आवाहन केले आहे. Diwali 2020: दिवाळीत फटाके फोडण्यावर मुंबई महापालिकेचे निर्बंध.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच जनतेला संबोधित करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी पर्यावरणपुरक साजरी करण्याचं आवाहन केले आहे. त्यावेळेस महाराष्ट्रात फटाकेबंदीचा निर्णय घेतलेला नाही पण आवाहन करतो की कमीत कमी फटाके फोडा. पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करा. मात्र बीएमसी कडून आज फटाके आणि आतषबाजीच्या बंदीचे नियम जारी करण्यात आले आहेत. Laxmi Pujan 2020 Date: यंदा लक्ष्मी पूजन कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी.
Brihanmumbai Municipal Corporation (BMC) bans bursting of firecrackers in public places under its jurisdiction. Use of soundless firecrackers like 'phooljhadi', 'anar' allowed between 8pm till 10 pm on Diwali only.
— ANI (@ANI) November 9, 2020
बीएमसीच्या नियमावलीनुसार, दारात रांगोळी आणि पणत्यांसोबत यंदा साबण-पाणी ठेवा. सॅनिटायझरचा वापर टाळा. सॅनिटायझर ज्वलनशील असल्याने त्याचा वापर करून दिव्यांजवळ जाऊ नका. तसेच फटाक्यांमुळे धूर होऊन आगामी दिवसांत श्वसनाचे त्रास होऊ शकतात. कोरोना रूग्णांच्या संख्येचा भडका उडू शकतो. त्यापार्श्वभूमीवर फटाकेबंदी आहे.
मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आल्याने काल राज्यभर मोठ्या मंडईंमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवत नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र होतं.