Shiv Sena Chief Uddhav Thackeray | (Photo: Facebook)

येत्या काही दिवसात दिपावलीचा सण येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अत्यंत साधेपणाने आणि संयमाने साजरे केले त्यासाठी जे काही सहकार्य करण्यात आले त्याला तोड नाही. राज्यात विविध सण साजरे केले गेले. तर आता दिवाळी आली असून जवळपास सर्वकाही सुरु करण्यात आले आहे. तर सध्या व्यवहार पूर्ववत होत आहे. पण सध्या खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.(Uddhav Thackeray: दिवाळीनंतर नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू कराव्यात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश)

आपण सगळ्यांनी कोरोनावर जिद्दीने सामना करत त्याचा वेग कमी केला. तर राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा नियंत्रणात आणला गेला आहे. पण दिल्लीत आकडा तर दिवसागणिक वाढत चालला आहे. तसेच तेथे प्रदुषणाची सुद्धा समस्या निर्माण झाली असून तो नागरिकांच्या फुफ्फूसावर परिणाम करतो. म्हणजेच काय दिवाळी साजरी करताना फटाक्यांवर बंदी आणायची का? याबद्दल बोलायचे झाल्यास प्रत्येकाने स्वत: त्याबद्दल जागृक रहावे.

lतसेच राज्यात  प्रदुषण करणारे फटाके टाळण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकणी फटाके वाजवू नका असे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दिवाळी आणि त्यानंतरचे पुढील 15 दिवस अत्यंत महत्वाचे आहे. कारण पाश्चिमात्य देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तेथे कठोर निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र राज्यात थंडीचे दिवस सुरु होणार असून कोरोनाची वाढ वाढत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या लढाईत मास्क हेच शस्र असल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटेल आहे.

गेल्या 8-9 महिने अत्यावश्यक सेवेतील नागरिक जनतेच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर आहेत. आपण सध्या सर्व गोष्टी सुरु करत आहोत पण त्यावेळी नियम बाळगणे अत्यावश्यक आहे. तसेच पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केल्यास तो आपल्याला भारी पडेल. कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु त्यासाठी सुद्धा जनतेची साथ हवी आहे.

दसऱ्यापर्यंत माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेमुळेच कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रणात आणण्यास यश आले. कोरोनाच्या काळात चाचणी करण्यासंदर्भात काम करणाऱ्या 60 हजार टीमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत. तर मुंबई आणि बाहेर मास्क नागरिकांकडून घातले जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याकरिता दंड स्विकारला जाणारच आहे.जर एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मास्क न घालता फिरल्यास त्यामुळे जवळजवळ 400 जणांचा त्याचा धोका उद्धभवू शकतो. दिवाळीनंतर 9,10,11 आणि 12 चे वर्ग सुरु केले जाणार आहेत. मात्र त्यावेळी खबरदारी घ्यावी.

तसेच दिवाळीनंतर मंदिरे आणि प्रार्थनास्थळांबद्दल एक नियमावली करुन निर्णय घेतला जाणार आहे. मास्क मंदिरात घालणे अनिवार्य असल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तर विरोधकांकडून या संदर्भात टीका केली जात आहे पण त्याचे मला काहीही वाटत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.(मुंबई महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याने नागरिकांकडून आतापर्यंत 4.78 कोटी रुपयांच्या दंडाची वसूली)

ज्यांनी घरात बसून काम करत असल्याची टिका केली त्यांना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी असे म्हटले की, घरात बसूनच कोटी रुपयांचे सामज्यंसपणे करार केले आहेत. राज्याला द्वेष्ट्यांनी राज्याला बदमान केल्याचे ही  उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

सामान्यांसाठी लोकल सुरु करण्यासंदर्भात केंद्र सरकारसोबत बोलणे सुरु आहेत. तसेच रेल्वेमंत्री पियुष गोयल सुद्धा यासाठी उत्तम पद्धतीने सहकार्य करत आहेत. मुंबईतील कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकल्पात मिळाचा खडा टाकला जात असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता केला आहे.

मेट्रोसाठी 545 दशलक्ष कोटी युरोचे कर्ज घेण्यात आले आहे.महाराष्ट्रात 41 लाख हेक्टर जमिनीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. 10 हजार कोटींची तरतूद नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी केली गेली आहे.  तसेच माजी सैनिकांना आणि विधवा यांना निवासी आणि घरपट्टी कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. सध्याची परिस्थिती बिकट आहे पण अर्थचक्र हळूहळू सुरळीत सुरु होत आहे. पण अखेर उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात मास्क लावा, हात धुत रहा आणि सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करा असे आवाहन जनतेला केले आहे.