Uddhav Thackeray: दिवाळीनंतर नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू कराव्यात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
कोरोना संकटामुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालंय अद्यापही बंद असून विद्यार्थी ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज दिले.
कोरोना संकटामुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालंय अद्यापही बंद असून विद्यार्थी ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज दिले. व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. तसेच जागतिक परिस्थिती बघता, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, राज्यातील शाळा गेल्या सात महिन्यांपासून बंद असून 15 जूनपासून ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. मात्र, इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे शैक्षणिक वर्ष महत्वाचे आहे. या उद्देशानेच हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 23 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांमधे विद्यार्थ्यांचे थर्मल चेकींग करण्यात येईल. एका बेंचवर बसविण्यात येईल. एक दिवसाआड वर्ग भरतील, विद्यार्थ्यांनी घरून जेवण करून यावे, स्वत:ची पाण्याची बाटली सोबत आणावी. चार तासांची शाळा राहील त्यात केवळ विज्ञान, गणित आणि इंग्रजी असे कठीण विषय शिकवले जातील. या विषयांसह बाकी विषयांसाठी ऑनलाइन वर्गांची सुविधा असेल असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. हे देखील वाचा-मुंबई महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याने नागरिकांकडून आतापर्यंत 4.78 कोटी रुपयांच्या दंडाची वसूली
ट्विट-
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत निर्देश.
शिक्षणमंत्री @VarshaEGaikwad , राज्यमंत्री @RealBacchuKadu उपस्थित.https://t.co/mUaQYPDJao
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 7, 2020
तसेच, ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स तयार करण्यात आले होते. ते सेंटर्स बंद करता येणार नाहीत. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का? त्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. तसेच शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी यासारख्या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. जे मुल आजारी आहेत किंवा ज्या घरातील व्यक्ती आजारी आहे, अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. व्हीडिओ कॉन्फरंसिंगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यामंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना क्रिष्णा आदि उपस्थित होते.
(The above story first appeared on LatestLY on Nov 07, 2020 09:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

