वांद्रा रेल्वेस्थानक परिसरात पुन्हा आग
Bandra-Fire File Photo

Bandra Fire :  मुंबई वांद्रे रेल्वे स्टेशनजवळ (Bandra Station) असलेल्या झोपडपट्टी परिसरात आग लागल्याने पुन्हा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. वांद्रा रेल्वे स्थानकाच्या नजीकच्या परिसरात धूराचे लोट पसरले आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत. वांद्रा पश्चिम भागातील शास्त्री नगर भागात आग लागल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. आगीचं नेमकं कारण, दुर्घटना यांच्याबद्दल अजूनही कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

 

स्थानिकांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोनुसार वांद्रे पश्चिम भागामध्ये ही आग लागली आहे.  वांद्रा परिसरात अनेक मोठमोठी कार्यालय असल्याने हा परिसर सकाळच्या वेळेस गजबजलेला असतो.