Fire broke out in computer room at Shree Mavli Mandal High School, in Thane West (Photo Credits: ANI)

ठाणे (Thane) येथील श्री मावळी मंडळ हायस्कूल (Shree Mavli Mandal High School) मध्ये आज (28 मे) आग लागल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे पश्चिम येथे असलेल्या या शाळेतील कंम्प्युटर रुममध्ये (Computer Room) आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत कोणतीही जीवीत किंवा वित्त हानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. (तारापूरमधील कारखान्यात भीषण स्फोट, 4 जण गंभीर जखमी)

ANI ट्विट:

सध्या मे महिना सुरु असल्याने शाळांना सुट्टी आहे. त्यामुळे आगीमुळे होणारी मोठी दुर्घटना टळली, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.