Pune Fire News: अग्निशमन दलाची कामगिरी, आगीमुळे घरात अडकलेल्या चिमुकलीला वाचवण्यात यश, पुण्यातील घटना
Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Pune Fire News: पुण्यात (Pune) एका इमारतीत आग लागली होती. या आगीत एक चिमुकली अडकली होती. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी करत मुलीला वाचवले आहे. या कामगिरीमुळे शरहात अग्निशमन दलाचे कौतुक होत आहे. काल रात्री १२ च्या सुमारास कात्रज परिसरातील नॅन्सी लेक होम या इमारतीला आग लागली आहे. आगीत चिमुकली अडकली होती. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

११ मजली इमारतीला आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात आग लागली होती. जवानांनी सर्वत्र आग विझवण्याचे काम सुरु केले. आग नियत्रंणात आणण्याचे शर्तीचे काम सुरु होते.  जवानांनी चौकशी केली तेव्हा एक चिमुकली अडकली असल्याची माहिती मिळाली. मुलगी खिडकीमधील लोखंडी ग्रीलमधे अडकल्याने वाचवण्याकरिता आरडाओरडा करीत होती. राजलक्ष्मी सुकरे असं या 9 वर्षीय मुलीचं नाव आहे. अग्निशमन दलाच्या कामाला यश आले आहे.

जवानांनी तातडीने मुलीला वाचवण्यासाठी काम सुरु केले. मुलगी खिडकीडवळ उभी होती. रस्सीचा वापर करून खिडकीजवळ एक शिडी लावली. तर काहींनी शेजारच्या गच्चीचा वापर करून मुलीला वाचवण्याचे काम सुरु केले. आगीमधे अडकलेल्या मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली. तसंच इमारतीला लागलेली आग वीस मिनिटात नियंत्रणात आली. या आगीत घराचं मोठं नुकसान झालं आहे. आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.