कामगार हॉस्पिटल (Photo Credits: ANI)

मुंबई येथील, ठाण्यातील कामगार हॉस्पिटलच्या स्टोअर रुममध्ये आग लागल्याची माहिती समोर येत आहे. ठ्ण्यातील वागळे इस्टेट भागात असलेल्या कामगार हॉस्पिटलमध्ये ही आग लागली आहे. माध्यमांनी दिलेल्या वृतानुसार या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक फायर इंजिन आणि एक वॉटर टँकर उपस्थित झाला आहे. न्यूज एजन्सी एएनआयने याबाबत वृत्त दिले असून, या ठिकाणच्या परिस्थितीबाबतचे काही फोटोजदेखील प्रसारित करण्यात आले आहेत.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु झाले असून, ही आग कशी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

(सविस्तर वृत्त लवकरच... )