Akola Police Recruitment Postponed: मुंबईप्रमाणेच अकोल्यात देखील काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच राज्यात पोलीस भरतीची प्रक्रीया सुरू आहे. अकोल्यातून पोलीस भरती संदर्भात मोठी बातमी आहे. तिथे पोलीस भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. पावसाचे कारण देत या भरती प्रक्रियेत काहिसा बदल झाल्याचे कारण देण्यात आले आहे. अकोला पोलीस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी आज 8 जुलै रोजी घेण्यात येणार होती. ती आता 11 जुलै रोजी होणार आहे. (हेही वाचा:Mumbai Rains: मुंबईत सहा तासात 300 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत )
आज 8 जुलै रोजी तब्बल 1 हजार 154 महिला उमेदवारांची मैदानावरील शारीरीक चाचणी होणार होती, पावसामुळे ही मैदानी चाचणी घेत येणार नाही. त्यामुळे चाचणी रद्द करण्यात आली आहे. आता ती 11 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. दरम्यान अकोला पोलीस दलात 195 पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया मागील 19 जून पासून सुरु झाली होती. पण काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे चाचणी घेण्यात येणारे मैदान तसेच वसंत देसाई स्टेडीयमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे या मैदानावर शारीरीक चाचणी घेता येणे शक्य नाही.
पोलीस भरतीसाठी नवे वेळापत्रक ठरले आहे. त्यानुसार भरती प्रक्रिया 11 जुलै रोजी होणार (Heavy Rain) आहे. त्यामुळे उमेदवारांनी 11 जुलै रोजी वेळेत हजर (Police Bharati 2024) राहावे, असं आवाहन अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांनी केले आहे.