मुंबईच्या (Mumbai) विविध भागामधून मुलांचं किडनॅपिंग (Kidnapping) केले जात असल्याच्या आशयाचे मेसेजेस सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहेत. पण हे मेसेज फेक असून त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. Zone VII चे डेप्युटी कमिशनर Prashant Kadam यांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडीयामध्ये वायरल मेसेज मध्ये किडनॅपिंग झालेल्या मुलांच्या बाबी या HDIL Kohinoor, कांजुरमार्ग, बीएमसी स्कूल विक्रोळी आणि घाटकोपर भागातील असल्याचं सांगण्यात आले आहे. पण हे दावे खोटे असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
वरिष्ठ अधिकार्यांनी वायरल झालेल्या मेसेज मधील पत्त्यावर माहिती घेतली आहे. तपासानंतर त्यांना हे मेसेजेस फेक असल्याचं आढळलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागरिकांनी कोणत्याही मेसेज किंवा ऑडिओ क्लिप वर, अफवांवर विश्वास ठेवू नये. रविवारी Zone X DCP Mahesh Reddy यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केले आहे. मेसेज मध्ये 20 वर्षीय व्यक्तीने 10 वर्षीय मुलाला अंधेरी भागातून उचलले असल्याचा दावा केला आहे. पण प्रत्यक्ष ठिकाणी गेल्यावर मात्र सीसीटीव्ही फूटेज, आजुबाजूच्या भागातील रहिवासी, दुकानदार यांनी मात्र या दाव्याला फेटाळलं आहे. हे देखील नक्की वाचा: Pune Shocker: पिंपरी चिंचवड मध्ये प्रेमभंगातून प्रेयसीच्या 7 वर्षांच्या भावाचं अपहरण करून निर्घुण खून; आरोपी अटकेत.
पवई भागामध्येही एका ऑडिओ क्लिप मध्ये एका महिलेने 3 मुलांना उचललं असल्याचा दावा केला होता. पण अशाप्रकारचे अपहरण झालेच नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.