महाराष्ट्रात सत्तास्थापनापूर्वी आजचा दिवस महत्वाचा, भाजप-शिवसेना यांच्यामधील वाद बाजूला पण राज्यपालांकडे लक्ष
Shiv Sena, Governor and BJP (Photo Credits-File Image)

महाराष्ट्रात विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला पूर्ण होत आहे. मात्र अद्याप राज्यात नव्याने सत्ता सुद्धा स्थापन झाली नाही आहे. त्यामुळे सत्ता स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट खरंच लागू होणार का हे गुलदस्त्यात आहे. गुरुवारी राज्यपाल बीएस कोश्यारी यांनी कायद्याच्या संबंधित मुद्द्यांवर महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या सोबत राजभवनात चर्चा केली. या दरम्यान भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये सत्तास्थापनेबाबत वाद सुरु आहेत. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. तर दुसऱ्याबाजूला राष्ट्रपती राजवट लागू होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपच्या नेत्यांनी काल कोश्यारी यांची भेट घेतली खरी पण सरकार स्थापनेचा दावा केला नाही. त्याचसोबत शिवसेना आम्हाला मुख्यमंत्री पद हवे या मागणीवर अडून बसली आहे. दुसऱ्या बाजूला भाजप त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार आणि यावर कोणतीही तडजोड होणार नाही यावर ठाम आहे. गुरुवारी कोश्यारी यांना भेटण्यापूर्वी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आम्ही राज्यपालांकडे सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी जात नसल्याचे विधान केले होते. भाजप कोणत्याही परिस्थिती अल्पमताने सत्ता स्थापन करु शकत नाही.

तसेच गुरुवारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आमदारांची बैठक मातोश्रीवर बोलावली होती. त्यानंतर पक्षातील सर्व आमदारांची हॉटेलवर रवानगी करण्यात आली होती. तर भाजपने आम्ही सत्ता स्थापन करण्यास सक्षम नाही असे स्पष्ट करावे असे शिवसेनेने म्हटले आहे. त्यानंतरच आम्ही सत्ता स्थापनासाठी महत्वाची पावले उचलणार आहोत. एवढेच नाही शिवसेनेचे नेते संजय राउत यांनी भाजप राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप केला आहे.(महाराष्ट्रात 9 नोव्हेंबर पर्यंत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यपाल यांच्याकडे 'हे' पर्याय)

विधानसभा निवडणूकीचे निकाल आल्यानंतर 15 दिवस उलटून गेले तरीही सत्ता स्थापन झालेली नाही. महाराष्ट्रात गेल्या 59 वर्षांपासूनच्या राजकीय कालखंडात फक्त दोन वेळाच राष्ट्रपती शासन लागू करण्यात आला होता. 1980 मध्ये फेब्रुवारी महिन्यात जून आणि त्यानंतरच्या वर्षात 2-14 मध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत जवळजवळ 33 दिवस राष्ट्रपती राजवट लागू केली होती. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी असे म्हटले की, आम्हाला मुख्यमंत्री पद द्यायचे असेल तर भाजपने समोर फोन करावा. यानंतर आता सत्ता स्थापनसाठी आजच्या दिवसात काय घडामोडी होणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.