Mahadev Betting App Case: महादेव बेटींग अॅप प्रकरणी ईडीची कारवाई सुरुच, अनेक ठिकाणी छापेमारी; बॉलिवूड निशाण्यावर
Enforcement Directorate | (File Image)

Enforcement Directorate Raids News: महादेव बेटींग अॅप (Mahadev Betting App Case) प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय धडक कारवाई करत आहे. प्रकरणातील ताजी घडामोड अशी की, ईडीने मुंबई आणि देशभरातील अनेक ठिकाणी या प्रकरणात छापेमारी सुरु केली आहे. खास करुन या प्रकरणात निशाण्यावर बॉलिवूड आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींच्या (Bollywood Celebrities) मुंबई येथील घर, कार्यालय, प्रॉडोक्शन हाऊस आणि संबंधित ठिकाणांवर धाड टाकली जात आहे. ही सर्व कारवाई मनी लॉन्ड्रींग झाल्याच्य संशयातून केली जात आहे.या प्रोडॉक्शन हाऊसला दुबईतून वित्तपूरवठा झाला असावा, असा संशय ईडीला आहे. प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत पाच ठिकाणी छापेमारी सुरु आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रॉडॉक्शन हाऊसला दुबई येथून बेकायदेशीररित्या वित्त पुरवठा झाल्याची प्राथमीक आहे. या प्रकरणात जवळपास 14 ते 15 सेलिब्रेटी ईडीच्या रडारवर आले असून, त्या सर्वांना समन्स बजावण्यात आले आहेत. यापूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी अभिनेता रणबीर कपूरला त्याच्या रायपूर येथील प्रादेशिक कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, अभिनेत्याने ईडीकडे हजर राहण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितला. कॉमेडियन कपिल शर्मा आणि कलाकार हुमा कुरेशी आणि हिना खान यांनाही फेडरल प्रोब एजन्सीने वेगवेगळ्या तारखांना चौकशीसाठी बोलावले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (PMLA) च्या तरतुदींनुसार त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करेल आणि अॅप प्रवर्तकांनी त्यांना कथितपणे केलेल्या पेमेंटची पद्धत आणि प्रवाह समजून घेण्याचा प्रयत्न करेल. या अभिनेत्यांना या प्रकरणात आरोपी केले जाऊ शकत नाही, असे समजते.

सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी प्रमोट केलेली कंपनी दुबईतून चालवली जात होती. ऑनलाइन बुक बेटिंग ऍप्लिकेशनचा वापर नवीन वापरकर्त्यांची नोंदणी करण्यासाठी, आयडी तयार करण्यासाठी आणि बेनामी बँक खात्यांच्या स्तरित वेबद्वारे पैसे लाँडर करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप एजन्सीने केला आहे.

मनी लॉन्डींग म्हणजे काय?

देशविदेशातील संपर्क वापरुन बेकायदेशिररित्या निर्माण केली जाणारी संपत्ती, काळा पैसा, निधी, गुंतवणूक आदींच्या माध्यमातून केला जाणारा संचय म्हणजे मनी लॉन्ड्रिंग होय. देशाचे नागरिक, सरकार आणि अधिकृत यंत्रणा यांना कोणतीही कल्पना न देता, करचुकवेगिरी करुन गैरमार्गाने निर्मिती केला जाणाऱ्या काळा पैसा, अथवा संपत्ती मनी लॉन्ड्रींग म्हणून ओळखली जाते. मनी लाँड्रिंगची व्याख्या ही प्रक्रिया अशी केली जाते ज्याद्वारे काळ्या पैशासारखा बेकायदेशीर निधी, बेकायदेशीर क्रियाकलापांमधून मिळवला जातो आणि कायदेशीर पैशाच्या वेशात, शेवटी पांढरा पैसा (व्हाईट मनी) म्हणून चित्रित केला जातो. हा पैसा एकमेकांचे हितसंबंध जोपासत परस्परांचे उद्योग, व्यवसाय, कर्ज, मतद अशा रुपामध्ये गुंतवला जातो.